MLA Aaditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Aaditya Thackeray News : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या 'एफडी'ची मुदत '31 डिसेंबर...' !

Mumbai Municipal Corporation : मुंबई महानगरपालिकेतील गैरकारभारावरुन आमदार आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर आरोप..

सरकारनामा ब्यूरो

Aaditya Thackeray News : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवले असतील. पण हा थोड्या दिवसांचा खेळ आहे, 31 डिसेंबरला महायुतीचे सरकार पडणार म्हणजे पडणारच असल्याचे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या खोक्यांच्या 'एफडी'ची मुदत 31 डिसेंबर असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई Mumbai महानगरपालिकेच्या एफडी कमी झाल्याच्या कारणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर ठाकरे गटाकडून आरोप सुरु आहेत. तर एफडी कमी झाल्याचे कारण आम्ही योग्य वेळी सांगू, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तर महानगरपालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे युवासेनेकडून 'स्वेट ऑन स्ट्रीट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या गैरकारभारावरील उपस्थित प्रश्नावर ते बोलत होते. पालिकेला दक्षिण मुंबईच्या रोड संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत मात्र अजूनही उत्तर दिले नाही. मुंबईसह महाराष्ट्राची लूट सद्याच्या सरकारकडून सुरु आहे.

दहिसर ,वरळी आणि इतर असे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत. हे सरकार आणि प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही, दिल्लीला उत्तर देत आहेत. पालिकेला आम्ही प्रश्न विचारले मात्र ते उत्तर देत नाही. त्यामुळे हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेणार आहोत, पुढील लढाई कोर्टात नेऊ. आमचं सरकार असताना प्रत्येक प्रकल्प संदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो चर्चा करायचो, प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो.

ऑक्टोबरच्या आसपास वरळी-शिवडी कनेक्टर व्हायला हवा होता. मात्र अजून झाला नाही, असे अनेक प्रकल्प आहेत जे लवकर पूर्ण होणार होते. मात्र या सरकारचे लक्ष नाही. खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना बदनाम करायचं कामं सुरु असून सरकार यंत्रणेचा गैरवापर करत आहे. त्याचप्रमाणे महायुती सरकारकडून बदनामी करायचं काम सुरु आहे. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला तसं मुंबई विकू देणार नाही. आरक्षणचा मुद्दा आहेच मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे आहे, असल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT