EKnath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Thane mayor politics: एकनाथ शिंदेंनी मुंबईत महापौरपद मागताच भाजपने ठाण्यात नाक दाबले : 'एक' दावा सोडावा लागणार?

Shinde Sena uneasy News : ठाण्याच्या राजकारणात नवी ठिणगी पडली आहे. येथील महापौरपदाबाबत मोठा 'ट्विस्ट' आला असून भाजपने दावा केला असल्याने एकनाथ शिंदेंचे शिलेदार अस्वस्थ झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले असले तरी काही ठिकाणी महायुतीच्या मदतीने सत्ता स्थापना करावी लागणार आहे. मुंबईत भाजप हा मोठा पक्ष असल्याने त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने महापौर पदावर दावा केला जाणार आहे. तर दुसरीकडे ठाण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्याठिकाणी भाजपची मदत लागणार आहे. त्यामुळे आता दोन्ही ठिकाणी महापौरपदासाठी भाजप व शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता ठाण्याच्या राजकारणात नवी ठिणगी पडली आहे. येथील महापौरपदाबाबत मोठा 'ट्विस्ट' आला असून भाजपने दावा केला असल्याने एकनाथ शिंदेंचे शिलेदार अस्वस्थ झाले आहेत.

राज्यात मुंबई, ठाणे व कल्याण डोंबिवली या तीन महापालिकेत भाजप (BJP) व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महायुती झाली होती. इतरत्र हे दोन्ही पक्ष सोयीनुसार एकमेकांविरोधात लढले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकीकडे मुंबईतील महापौर पदावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला असल्याने ठाणे महापालिकेतील संख्याबळ पाहता. याठिकाणी महायुतीचा महापौर होणार हे जवळपास निश्चित असताना त्याठिकाणी आता भाजपने महापौर पदावर दावा केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

131नगरसेवकांच्या ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले आहेत तर भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत. या ठिकाणी भाजप व शिवसेनेने (Shivsena) महायुती केली होती. त्यामुळे याठिकाणी दोन्ही पक्षाचे मिळून 103 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 तर अजित पवार यांच्या पक्षाचे 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झाले आहे.

दुसरीकडे ठाण्याच्या महापौरपदावरून मोठा 'ट्विस्ट' आला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्वबळावर महापौर होऊ शकतो. त्यामुळे भाजपने दोन वर्ष महापौरपद भाजपला देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ठाण्यात भाजपचा स्ट्राइक रेट हा १०० टक्के राहिला आहे. त्यामुळे भाजप आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी या पदावर दावा केला आहे. अन्यथा भाजप विरोधी पक्षात बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

भाजपने दिलेल्या या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार अस्वस्थ झाले आहेत. भाजपने केलेल्या मागणीमुळे शिंदेंच्या शिवसैनिकात नाराजीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपच्या या दाव्याबाबत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची चर्चा होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महापौर निवडीवरून ठाण्यातील वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT