Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke : अवघ्या चारच महिन्यांत भालके 'बीआरएस'ला रामराम ठोकणार ? पुन्हा राष्ट्रवादी की...

Pandharpur Politics : केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली होती.परंतु...

Deepak Kulkarni

Pandharpur News : पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत के चंद्रशेखर राव यांच्या 'बीआरएस' पक्षात प्रवेश केला होता.मात्र,अवघ्या चारच महिन्यात भगीरथ भालके हे बीआरएस पक्षाला कंटाळले असून ते परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झालेली आहे.

मागील तीन महिन्यापासून भगीरथ भालके बीआरएसपासून फारकत घेऊन आहेत आणि अजित पवारांचे निरोप घेऊन विधान परिषद सदस्य त्यांच्या घरी ये-जा करत असल्याचे समोर आले आहेत.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली नाही असा आरोप करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.यानंतर त्यांनी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला.केसीआर यांनी भालके यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली होती.परंतु भगीरथ भालके यांचे मन बीआरएसमध्ये रमलेच नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दोन महिन्यांपासून ते बीआरएसच्या कार्यक्रमात,बैठकांना दिसत नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले.तर अजित पवार गटाला पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात सक्षम नेता राहिलेला नाही.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले भारत भालके यांचे २०२० साली आकस्मित निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिडणुकीत त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके याना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र, निसटत्या मतांनी भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर भालके चेअरमन असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ताही अभिजीत पाटील यांनी हिसकावून घेतली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला होता 'हा' आरोप

तर जून महिन्यात याच अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पवारांनी अभिजीत पाटील यांना २०२४ साली उमेदवारी देण्याचे सूतोवाच केले होते. यानंतर दुखावलेल्या भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली नाही असा आरोप करत वेगळा मार्ग निवडला होता.

भालके यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला. केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली होती.परंतु भगीरथ भालके यांचे मन बीआरएसमध्ये रमलेच नाही. गेल्या दोन महिन्यांपासून ते बी आर एस च्या कार्यक्रमात, बैठकांना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. तर अजित पवार गटाला पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात सक्षम नेता राहिला नाही.

दरम्यान, अजित पवार(Ajit Pawar) गट सत्तेत सामील झाला.अजित पवार गटाने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात आपले बस्तान बसवण्यासाठी भगीरथ भालके यांना गळ टाकला आहे.विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी भालके यांच्या सरकोली निवासस्थानी अजित पवारांचे आमंत्रण घेऊन गेल्याचे सांगितले जाते. मागील दोन महिन्यात भगीरथ भालके हे अजित पवार गटाच्या जवळ गेलेले असून त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चाही मतदारसंघात सुरू झालेल्या आहेत.

...तर अभिजीत पाटील विरुद्ध भालके...

आगामी विधानसभा निवडणूक समोर घेऊन भगीरथ भालके यांचा लवकरच राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पक्षात प्रवेश होईल असे सांगितले जाते.जर भालके यांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर आगामी काळात पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT