Bhalke supporter join BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhalke Group News : भालकेंना मंगळवेढ्यात धक्का; शिंंदेंना पाठिंबा दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपत प्रवेश

Solapur Loksabha Election 2024 : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत भालके समर्थक ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मंगळेवढ्यात भगीरथ भालके यांना मोठा धक्का बसला आहे. भालके यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर भालके गटाच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) निवडणुकीचे मतदान जसं जसं जवळ येत आहे, तसतसे राजकीय फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. एकमेकांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेमंडळी गळाला लावण्याचे काम विरोधी गटाकडून होत आहे. सोलापूरमध्ये आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) हे ऐकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली होती. त्या अर्ज भरण्याच्या सभेत भालके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवार शिंदे यांना पाठिंबा देणे स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेले दिसत नाही.

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर भगीरथ भालके यांना‌ मंगळवेढ्यात मोठा धक्का बसला आहे.मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत भालके समर्थक ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे सध्या भारत राष्ट्र समितीमध्ये आहेत. मात्र, प्रवेशापासून ते बीआरएसमध्ये म्हणावे तेवढे सक्रीय दिसत नाहीत. मात्र, त्यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी पक्ष मात्र जाहीर केलेला नाही. त्यामुळे भालके हे आगामी निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीत त्यांना ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे यांची भूमिका काय असणार यालाही महत्व आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT