Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिलेदार उतरला मैदानात...

Samadhan Autade wrote Letter Rahul Narwekar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून मराठा आरक्षणावर एक दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 August : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यांना अनेक लोकप्रतिनिधींनीही आपला पाठिंबा दर्शविला आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून जाहीरपणे कोणीही पुढे आले नव्हते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळेवढ्याचे भाजप आमदार समाधान आवताडे हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, त्यामुळे स्वपक्षाच्या आमदाराची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करणार का? अशी चर्चा रंगली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात विशेषतः मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी आज (ता. 29 ऑगस्ट) एक दिवसाची मुदत देण्यात आली होती. पण, मराठा आरक्षण आंदोलकांनी पोलिसांकडे पुन्हा वाढीव मुदत वाढवून मागितली आहे. त्यानुसार उद्याचा (ता. 30 ऑगस्ट) एक दिवस वाढवून देण्यात आलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी भेटीगाठी घेण्यात सुरुवात केली आहे. तसेच, सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील काही आमदारांनीही जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. काहींनी तर थेट व्यासपीठावर जाऊन आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, अभिजीत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश साळंके, विजयसिंह पंडीत या नेत्यानं थेट व्यासपीठावर जाऊन जरांगेंना पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, भाजपकडून कोणीही पुढे आलेले नव्हते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade ) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एक दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांंगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज मुंबईत आझाद मैदानावर एकवटला आहे. गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळे विधीमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी आवताडे यांनी केली आहे.

याबाबत आमदार समाधान आवताडे म्हणाले, मनोज जरांंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरू आहे. कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विधीमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT