Kolhapur Politic's : कोल्हापुरात हसन मुश्रीफ ‘पॉवर’फुल्ल; बंटी पाटील, महाडिकांसह शिवसेना भाजपसमोर कडवे चॅलेंज!

Hasan Mushrif News : मागील दहा वर्षांच्या कालावधीत मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता जिल्ह्यातील राजकारण प्रत्यक्षपणे मंत्री मुश्रीफ यांच्या हाती गेले आहेत.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 29 August : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ‘कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी मुश्रीफांनी केवळ कागल तालुक्यापुरतीच मर्यादित ठेवली,’ असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले होते. पण, सद्यस्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादीचे अस्तित्व जिल्ह्यात केवळ नावापुरतीच उरली आहे. काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुश्रीफांनी राष्ट्रवादीचा पाया प्रत्येक तालुक्यांत भक्कम केला आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कुमकवत होती, त्याच ठिकाणी आता मंत्री मुश्रीफ यांनी काँग्रेसचे बडे मासे गळाला लावले आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या माध्यमातून सर्वच चाव्या मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आहेत. त्यातच आता जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रबळ गट मंत्री मुश्रीफ यांच्या टप्प्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेला त्याचा निश्चितच फटका बसणार आहे.

के. पी. पाटील यांची घरवपासी, ए. वाय पाटील यांची छुपी मदत, तर काँग्रेसचे राहुल पाटील यांचा नुकताच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, हातकलंगले तालुक्यातील काँग्रेसचा मोठा गट राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) दबदबा निश्चितपणे वाढणार आहे.

वास्तविक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. विरोधातील पक्षातील उमद्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षे विरोधात राहावे लागणार असल्याने आतापासूनच त्यांनी सत्ताधाऱ्यातील इतर पक्षांना जवळ केले आहे. मात्र, जे मूळ काँग्रेसच्या विचारधारेचे आहेत. त्यांना राष्ट्रवादी हा काँग्रेसच्या विचारांशी मिळता जुळता पक्ष असल्याने अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार के. पी. पाटील यांनी महायुतीतील उमेदवाराची अडचण लक्षात घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून ते पराभूत झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सत्तेतील पक्षाचा पर्याय शोधला. राजकीय विश्वासहर्ता नसल्याने माजी आमदार के. पी. पाटील यांनी पुन्हा मंत्री मुश्रीफ यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे दाखवून देत राष्ट्रवादीत घरवापसी केली.

Hasan Mushrif
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नेत्याच्या मुलानेही भरपावसात आझाद मैदान गाठले!

करवीर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती तीच आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील पक्षप्रवेशाच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम देत थेट राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. सत्तेतील पक्षाला जवळ केल्याने कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बळ मिळणार आहे. शिवाय विकास कामांनाही चालना मिळेल, अशी भावना या कार्यकर्त्यांना आहे.

सहकारातील प्रमुख संस्थांच्या आर्थिक नाड्या मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आहेत. गोकुळ दूध संघावर मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ अध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेवर स्वतः मुश्रीफ अध्यक्ष आहेत. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती देखीलमध्ये मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे.

शेतकरी संघात सर्वपक्षीय सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुश्रीफ आपल्याला न्याय देतील, याच भूमिकेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुक लोकप्रतिनिधींची भावना आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत वादाचा फटका आपल्याला बसणार नाही, याची काळजी करत आणि त्याच्या भीतीपोटी अनेकांनी राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला आहे.

दुसरीकडे, मागील दहा वर्षांच्या कालावधीत मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता जिल्ह्यातील राजकारण प्रत्यक्षपणे मंत्री मुश्रीफ यांच्या हाती गेले आहेत. मागील दहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री मुश्रीफ यांच्यावर महायुतीचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे करवीर, हातकणंगले, राधानगरी बड्या ठराव धारकांना सोबत घेण्याची रणनीतीही मंत्री मुश्रीफ यांनी आखली आहे.

Hasan Mushrif
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप; ‘जरांगेंच्या चेहऱ्याआडून फडणवीसांचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न; त्यात अजितदादांचे आमदारही...’

दोनच दिवसांपूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा मिठाचा खडा पडेल, असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांच्या या पक्षप्रवेशामुळे आपले पारडे जड केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com