CM Eknath Shinde News : महाराष्ट्रातील साधुसंत, धर्मगुरूंचे आशीर्वाद आमच्यासाठी मोलाचे आहेत. अध्यात्मिक क्षेत्रासाठी विशेषत्वाने तीर्थक्षेत्रांचा विकास व साधू संतांच्या सेवेसाठी राबविलेल्या योजना महाराष्ट्रभर भक्ती - शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद रूपात पोहचवाव्यात.
या हेतूने आम्ही शिवसेना (Shivsena) धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले (Akshay Maharaj Bhosle) यांचे वर ही जबाबदारी सोपवली आहे. आध्यात्मिक सेवेतले त्यांचे योगदान व जनसंपर्क पाहता भक्ती - शक्ती संवाद यात्रा निश्चितच महाराष्ट्रात क्रांती घडवेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेतर्फे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण या विभागातील 36 जिल्ह्यात ही संवाद यात्रा जाणार आहे. सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी पासून पंढरपूर येथून या यात्रेचा शुभारंभ होत असून या संवाद यात्रेस मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संवाद यात्रेचे मार्गदर्शक खासदार श्रीकांत शिंदे, भक्ती - शक्ती संवाद यात्रेचे प्रमुख संत साहित्यिक अभ्यासक अक्षय महाराज भोसले तसेच धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अक्षयमहाराज भोसले म्हणाले, धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मार्गर्शनाखाली राज्यातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या अडीअडचणी समजावून घेत त्याठिकाणी निधीची तरतूद करत सर्वांगीण विकास साधत सर्व सोयीसुविधा पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील नानाविध भक्ती पंथ, तीर्थक्षेत्र व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार व निरुपणकार, गावोगावी असणारे भजन मंडळ यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. आजपासून सुरू होत असलेल्या संवाद यात्रेस मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी आपल्या वर टाकलेल्या जबाबदारी यशस्वीपणे पेलत यात्रा संपन्न करू, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेद्वारे यात्रेचे प्रमुख संत साहित्य अभ्यासक अक्षयमहाराज भोसले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष सन्मान केला. तर धर्मवीर अध्यात्मिक सेनेतर्फे मुख्यमंत्री यांना भक्ती - शक्ती विग्रह भेट देण्यात आला.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.