VijayShinh Mohite Patil-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil News : बावड्याच्या पाटलांकडे आलेले फडणवीस अकलूजच्या मोहिते पाटलांच्या नाराजीवर बोलणार का?

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 April : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असलेले बावड्याचे पाटील तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर येथे आले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मेळाव्याला हजेरी लावणारे फडणवीस शेजारच्या अकलूजच्या मोहिते पाटलांच्या नाराजीवर बोलणार का, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलांनी जो पक्ष आम्हाला विधानसभेला मदत करतील, त्यांचेच काम आम्ही लोकसभेत करू, असे सांगून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले होते. मात्र, महायुतीत एकत्र असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बारामतीची जागा गेल्यामुळे सुनेत्रा पवार यांचे काम करावे, यासाठी फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेतली हेाती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील बैठकीनंतर इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा घेण्याचे ठरले होते. त्यानुसार आज इंदापूरमध्ये मेळावा होत आहे. त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस हे हर्षवर्धन पाटील यांना काय शब्द देणार, यासाठी मेळाव्याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीमध्ये डावलल्यामुळे अकलूजचे माहिते पाटील हे भाजपवर कमालीचे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून सुरुवातीच्या काळात प्रयत्न झाले होते. मात्र, त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मोहिते पाटील यांची आक्रमक रणनीती पाहून भाजपनेही आपले डावपेच बदलेले आहेत.

मोहिते पाटील यांना वगळून भाजपकडून माढ्यासाठी निवडणूक व्यूहरचना आखली जात आहे. तरीही अकलूजच्या मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी इंदापूरच्या भाजप मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार का? किंवा कोणता इशारा देणार का?, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT