Solapur, 22 March : रणजितसिंह नाईक निंबाळकर-मोहिते पाटील यांच्या वादामुळे राज्याच्या केंद्रस्थानी आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघाच्या माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर आणि मोहिते पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला किती यश येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या 40 वर्षांपासून माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरोधात जानकर असे राजकारण अख्ख्या सोलापूर जिल्ह्याने पाहिले आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून विधानसभा, लोकसभेपर्यंत हे दोन्ही गट एकमेकांविराधात उभे ठाकले आहेत. कायम सत्तेवर असणाऱ्या मोहिते पाटील यांच्या विरोधात जानकर यांनी टोकाचा संघर्ष केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माळशिरसचे उत्तम जानकर (Uttam Jankar) हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आपल्या विचारांचा गट वाचविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तम जानकर यांनी भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जानकर यांनी विधानसभेला भाजपचे राम सातपुते यांना जोरदार लढत दिली होती. त्या लढतीत अवघ्या 2590 मतांनी जानकर यांचा निसटता पराभव झाला, त्यामुळे निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य देणाऱ्या मोहिते पाटील (Mohite Patil) यांना जानकर यांनी ताकद दाखवून दिली.
दरम्यान, भाजपकडून मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारीसाठी डावलण्यात आले आहे. त्यामुळे मोहिते पाटील हे माढ्यातून निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यामुळे त्यांनी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यातूनच मोहिते पाटील आणि जानकर यांच्यातील काही कॉमन मित्रांनी ही भूमिका मांडली आहे.
जानकर आणि मोहिते पाटील यांच्यातील मित्रांनी मांडलेल्या भूमिकेमुळे माळशिरसमधील हे दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. माढा लोकसभेत जानकर यांनी मोहिते पाटील यांना, तर माळशिरस विधानसभेला मोहिते पाटील यांनी उत्तम जानकरांना मदत करावी, असा तो प्रस्ताव आहे.
मागील 40 वर्षांपासून जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. आता मोहिते पाटील यांनी माढ्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे जानकर-मोहिते पाटील एकत्र आल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.