Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jarange Patil News : भुजबळावर बोलावे इतकी त्याची लायकी नाही... जरांगे पाटलांचा टोला

Umesh Bambare-Patil, Anand Surwase

-आनंद सुरवसे

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाची आपली लढाई यापुढे आपल्यालाच लढावी लागणार आहे. मात्र, भुजबळांना आता मराठा समाजाने किंमत द्यायची गरज नाही. घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने कायदा पायदळी तुडवणे योग्य नाही. त्यामुळे भुजबळांवर बोलावे इतकी त्याची लायकी नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेत मंत्री भुजबळांना लगावला.

मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील गांधी मैदानावर आज मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची तोफ धडाडली. त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत मराठा आरक्षणासाठी आता गावागावांत साखळी उपोषणाची हाक दिली. तसेच भुजबळांनाही Chhagan Bhujbal टोले लगावले.

जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आपली लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. यापुढे भुजबळांना मराठा समाजाने किंमत द्यायची नाही. घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने कायदा पायदळी तुडवणे योग्य नाही. मी टप्प्यात आला की वाजवतो, पण भुजबळांवर बोलावे इतकी त्याची लायकी नाही.

माझे शिक्षण किती यावर सरकार तीन दिवस राबत होते. भुजबळ म्हणतो पाचवी शिकलोय. मुंबईमध्ये तुम्ही कसे जगला हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा करून तुम्ही जगलात म्हणून त्यांना बेसन खावे लागले, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचले जात आहे. हे षडयंत्र आपल्याला मोडून काढावे लागेल. मराठ्यांना ७० वर्षांपासून आरक्षण असतानादेखील ते मिळून दिले नाही. त्यासाठी ओबीसी नेत्यांचा दबाव सरकारवर होता. मराठा आरक्षण होते आता पुरावे सापडले आहेत. Maharashtra Political News

आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले असते, तर जगाच्या पाठीवर मराठा समाज प्रगत म्हणून ओळखला गेला असता. केवळ मराठा समाजाला मोठे होऊ द्यायचे नाही म्हणून हे षडयंत्र रचले आहे. आरक्षणाचे पुरावे लपवून ठेवले.

७० वर्षे आमचे नुकसान कोणी केले, याचे नाव पुढे आले पाहिजे. तसेच आम्हाला झालेले नुकसान भरून पाहिजे. आरक्षण असताना आम्हाला दिले नाही. आता मराठा कुणबी असल्याचे नोंदी मिळत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे, पण मराठा समाजाने गाफील राहू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT