Krishna Sugar Factory and Rayat Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Krishna Sugar Factory VS Rayat Sugar Factory: राजकीय हेवेदावे विसरून 'रयत'च्या मदतीला धावला 'कृष्णा'

Krishna Sugar Factory and Rayat Sugar Factory: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत कृष्णा कारखान्याने केली मदत

Vishal Patil

Karad News: कराड तालुका राजकीयदृष्ट्या प्रगल्भ मानला जातो. इथले नेते राजकारणाची पातळी घसरू देत नाहीत, असा अनुभव आहे. याचाच प्रत्यय यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांनी दिला. विरोधक असलेल्या उंडाळकर गटाच्या रयत सहकारी साखर कारखान्यातील महत्त्वाचा वापर असलेली मोटार नादुरुस्त झाल्यानंतर फायबरायझर एचटी मोटार कृष्णा कारखान्यातून देण्यात आली. यामुळे रयतला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि कारखान्याचेही कोट्यावधीचे नुकसान टळले.

कराड दक्षिणच्या राजकारणात भोसले आणि उंडाळकर हे मात्तबर गट आहेत. या दोन्हीही गटांनी दोन दशके हातातहात घालून राजकारण केले. कालातंराने कराड दक्षिणची राजकीय समीकरणं बदलली आणि हे दोन गट एकमेकांच्या विरोधात गेले. गेल्या काही वर्षांपासून हा विरोध टोकाला पोहचला. या दोन्ही कुटुंबाकडे कृष्णा आणि रयत असे साखर कारखाने आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रयत कारखान्याची गाळप क्षमता यावर्षीपासून वाढवण्यात आली आहे. नव्याने सगळं असल्याने अनेक अडचणीचा सामना करत हा गळीत हंगाम सुरु आहे. मंगळवारी रयतची फायबरायझर एचटी (Fiberiser HT) मोटार नादुरुस्त झाली. ही मोटार बंद असल्याने कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की आली. कारखाना व्यवस्थापनाने मोटार दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मोटार दुरुस्त व्हायला वेळ लागणार अशी स्थिती होती.

काय करावं हा प्रश्न समोर असताना कृष्णा कारखान्याकडे तशीच मोटार शिल्लक असल्याची माहीती मिळाली. मात्र, विरोधक असल्याने 'कृष्णा' ही मोटार देणार की नाही हा प्रश्न होता. तरीही 'रयत'च्या व्यवस्थापनाने 'कृष्णा'च्या व्यवस्थापनाकडे यासंदर्भात चर्चा केली. कृष्णाच्या अधिकाऱ्यांनी हा विषय अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांच्यापर्यंत पोहचवला. डॉ.भोसले यांनी तातडीने ही मोटार 'रयत'ला द्यावी अशा सूचना दिल्या.

कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला नको म्हणून हा निर्णय घेतल्याचं नंतर सांगण्यात आलं. डॉ.भोसले यांच्या निर्णयामुळे रयतचे अधिकारी सुखावलेच पण कृष्णाचे अधिकारीही आवाक झाले. कारण सध्या ऊसाची कमरता आहे. त्यामुळे एकमेकांचा ऊस पळवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉ.सुरेश भोसले यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याने डॉ.भोसले यांचे कौतुक होत आहे. माजी मंत्री विलासराव उंडाळकर आणि सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्यातील समन्वयाची आठवण अनेकांना झाली.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT