Sanjay Mandlik, Raju shetti, Dhairyasheel Mane, Satyajeet Patil #ShahuMaharaj Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरच्या आखाड्यात सोमवारपासून शड्डूंचा आवाज घुमणार; अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात

Kolhapur politics : महायुतीकडून दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती निश्चित मानली जात आहे. ता. 15 एप्रिल ते 16 एप्रिल हे दिवस शुभ असल्याने अनेकांनी त्याच दिवसांना पसंती दिली आहे. शिवाय अपक्षांनीही त्याच दिवसाची निवड केल्याने नियोजनाची झुंबड उडणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 11 April : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरविण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला वेळ लागला असला तरी उद्यापासून त्याची खरी रंगत पाहायला मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगलेतून, तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी जवळपास मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीकडून उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्याने खऱ्या अर्थाने अजून प्रचाराला रंगत येणे बाकी आहे. त्यातच उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून कोण कोणते मल्ल निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे चित्र जवळपास 21 एप्रिलपर्यंत स्पष्ट होईल.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी (Kolhapur and Hatkanangle Lok Sabha constituencies) शुक्रवारपासून (ता. 12 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार सोमवारी 15 आणि मंगळवारी 16 रोजी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उपस्थिती निश्चित मानली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ता. 15 एप्रिल ते 16 एप्रिल हे दिवस शुभ असल्याने अनेकांनी त्याच दिवसांना पसंती दिली आहे. शिवाय अपक्षांनीही त्याच दिवसाची निवड केल्याने नियोजनाची झुंबड उडणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच सरळ लढत होणार, हे निश्चित असले, तरी उमेदवार निश्चितीचा गोंधळ महिनाभर सुरू राहिला होता.

कोल्हापूरच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत चढाओढ राहिली. त्यातून काँग्रेसने बाजी मारत शाहू छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली. महायुतीतून संजय मंडलिक यांना कोल्हापुरातून, तर हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापुरात उमेदवार उभा न देण्याचा निर्णय घेतला आहे. हातकणंगलेमध्ये डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील-सरूडकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत असली तरी सर्वच उमेदवार सोमवारपासून अर्ज भरणार आहेत. महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासह 'स्वाभिमानी चे नेते राजू शेट्टी हेही सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. आघाडीचे शाहू छत्रपती व सत्यजित पाटील हे मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT