Mohite Patil-Ramraje-Jaykumar Gore-Ranjitshinh Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha News : रामराजे-मोहिते पाटील विसरा; जयकुमार गोरेंच्या हाती माढ्याचा कासरा

Loksabha Election 2024 : मोहिते पाटील घराण्याने यंदा आपला माणूस, आपला खासदार ही घोषणा दिली होती. इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, दुसरीकडे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले जिवश्च कंठश्च मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी बेरजेचे राजकारण करण्याचा व वरिष्ठांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला होता.

रुपेश कदम

Madha News : सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत माढ्यातील रथीमहारथींपेक्षा एकच जयकुमार गोरे भारी ठरले आहेत. मातब्बरांच्या विरोधाला ‘कात्रजचा घाट’ दाखवत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा एकदा माढा लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे 'रामराजे-मोहिते पाटील विसरा, जयकुमार गोरेंच्या हाती माढ्याचा कासरा' असे म्हणायला हरकत नाही.

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक-निंबाळकर व मोहिते पाटील घराणे यांचा कडवा विरोध होता. रामराजे हे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासाठी कमालीचे आग्रही होते. जर संजीवराजेंना उमेदवारी मिळाली नाही, तर रणजितसिंह यांनासुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही, असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील घराण्याने यंदा आपला माणूस, आपला खासदार ही घोषणा दिली होती. इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, दुसरीकडे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आपले जिवश्च कंठश्च मित्र रणजितसिंह (RanjitShinh Naik Nimbalkar)नाईक- निंबाळकर यांच्यासाठी बेरजेचे राजकारण करण्याचा व वरिष्ठांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला होता.

माण तालुक्यात शासकीय विश्रामगृह तसेच आपल्या निवासस्थानी जयकुमार गोरे हे विविध मान्यवरांशी गुफ्तगू करत होते. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते, मोहिते पाटील यांचे विरोधक उत्तमराव जानकर, पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी ठरले होते.

हे सर्व सकारात्मक चित्र पक्षश्रेंष्ठीसमोर उभे करण्यात गोरे-निंबाळकर द्वयीला यश आले आहे. तसेच, दिल्ली दरबारीसुद्धा गोरे यांनी आपले वजन रणजितसिंह यांच्यासाठी पणाला लावले होते. त्यामुळे रामराजे (Ramraje) व मोहिते पाटील यांचा विरोध डावलून पक्षश्रेंष्ठीनी रणजितसिंहना उमेदवारी बहाल केली आहे.

रणजितसिंह यांना माढ्याची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्याने आमदार जयकुमार गोरे यांचे भाजपमध्ये राजकीय वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह यांच्या प्रचाराच्या नियोजनाची एकहाती धुरा आमदार जयकुमार गोरे यांच्या हातात असल्याने रणजितसिंह यांच्या विजयासाठी आमदार गोरे जिवाचे रान करतील, यात शंका नाही.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT