Madha Lok Sabha Constituency : निंबाळकरांची उमेदवारी जाहीर होताच माढ्यात महायुतीला पहिला धक्का; संपर्क प्रमुखांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Shiv Sena Madha Sampark Pramukh Resign : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल, त्या कोणत्याही व्यक्तीला आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले. भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
Sanjay Kokate
Sanjay KokateSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माढ्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच चोवीस तासांच्या आत महायुतीला धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे सांगितले.

शिवसेनेचे (Shivsena) शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे (Sanjay Kokate) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडताना त्यांनी आपले पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवरही आरोप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Kokate
Praniti Shinde News : भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रणिती शिंदेंचे सडेतोड उत्तर; ‘माझ्या रक्तातच काँग्रेस; ती केवळ अफवा’

माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही. मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवाराचा जीव तोडून प्रचार केला. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही. उलट युती म्हणून शिवसेना उमेदवाराचे काम करणे अपेक्षित असताना भाजपच्या संबंधित नेत्याने आमच्या विरोधात काम केले आहे, त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याची भूमिका संजय कोकाटे यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल, त्या कोणत्याही व्यक्तीला आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले. भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही आरोप कोकाटे यांनी केला. त्यातूनच आपण आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देत आहोत, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

विजय शुगर कारखान्याच्या विक्री प्रकरणात संबंधित नेत्याने आमदार बबनराव शिंदे यांचे हित पाहिले. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे देणे आणि शेअर्स रक्कम याकडे डोळेझाक करण्यात आली. हेच नेते मला आणि नागनाथ कदम यांना शिंदे यांच्याविरोधात तक्रारी करायला लावायचे आणि दुसरीकडे टेंभुर्णीच्या फार्म हाऊसवर शिंदेंचा पाहुणचार घेऊन तडजोडी करत होते, असाही आरोप कोकाटे यांनी केला आहे.

Sanjay Kokate
Loksabha Election 2024 : डॉ. सुभाष भामरेंना प्रबळ इच्छुकांच्या नाराजीचा फटका बसणार?

आमदार शिंदे यांच्या भ्रष्टाचारी आणि जुलूमी राजवटीला जे पक्ष आणि व्यक्ती सहकार्य करतील, ते आमचे विरोधी पक्ष या नात्याने आम्ही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. विचारांशी गद्दारी शक्य नाही, लुटारूंना साथ देणं शक्य नाही, भाजपचा प्रचार करणं शक्य नाही!, असे म्हणत कोकाटे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो. कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीने काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Sanjay Kokate
Ajit Pawar News: अजितदादा आज बारामती पिंजून काढणार; दिवसभरात सात सभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com