Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde News : भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रणिती शिंदेंचे सडेतोड उत्तर; ‘माझ्या रक्तातच काँग्रेस; ती केवळ अफवा’

Solapur Lok Sabha Constituency : मी ईडीला भीत नाही. कारण माझ्याकडे कारखाना नाही की संस्था नाही. नशीब सुशीलकुमार शिंदे त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसलीही भीती नाही. मी दिलखुलासपणे भाजपविरुद्ध बोलणार असल्याचा निर्धार प्रणिती शिंदे यांनी या वेळी बोलून दाखवला.

विश्वभूषण लिमये

Solapur News : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आणि लोकसभेची आगामी निवडणूक भाजपकडून लढणार, अशी चर्चा रंगली आहे. त्याला आमदार शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझ्या रक्तातच काँग्रेस आहे, असे प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे (Pranti Shinde) यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) गावभेटीचा सपाटा लावला आहे. त्या सध्या गावोगावी फिरत आहेत. त्यावेळी त्यांनी आपण काँग्रेस (Congress) सोडून कुठेही जाणार नाही, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे. बाकी सर्व आमदार महायुतीचे आहेत. ते आमदार सत्ताधाऱ्याविरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या समस्या सत्ताधाऱ्यांसमोर कोण मांडणार? असा सवाल करून त्यांनी सध्या हुकूमशाही सरकार असल्यामुळे आमदार घाबरत आहेत, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील गावभेटीदरम्यान केली.

दरम्यान, सोलापूर लोकसभेची निवडणूक मी भाजपकडून लढविणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझ्या रक्तातच काँग्रेस आहे. माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत; म्हणून मी काँग्रेसमध्ये नाही, तर सर्वधर्मसमभाव या विचारावर माझा विश्वास आहे. मी कामावर विश्वास ठेवते. मी लोकशाहीवर विश्वास ठेवते आणि मी संविधानावर विश्वास ठेवते; म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे, असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला.

मी ईडीला भीत नाही. कारण माझ्याकडे कारखाना नाही की संस्था नाही. नशीब सुशीलकुमार शिंदे त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसलीही भीती नाही. मी दिलखुलासपणे भाजपविरुद्ध बोलणार असल्याचा निर्धार प्रणिती शिंदे यांनी या वेळी बोलून दाखवला.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT