Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. या वेळी भामरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर होती. त्यामुळे जवळपास दहा इच्छुक उमेदवारीसाठी कामाला लागले होते. आता हे इच्छुक भामरे यांना मनापासून मदत करतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धुळ्यासाठी भाजपने डॉ. भामरे (Dr. Subhash Bhamre) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भामरे यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. यामध्ये शिरपूरचे आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांनीही पडद्यामागून सूत्रे हलवली होती. त्यांनी स्वतः राजवर्धन कदमबांडे यांच्या उमेदवारीसाठी आपला शब्द खर्च केला होता. विरोधकांनी जोरदार खेळी करू नये, अंतिमतः पक्षश्रेष्ठींनी भामरे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधक व समर्थकांची मोट बांधणे हे डॉ. भामरे यांच्यापुढे एक अवघड काम असेल.
धुळे (Dhule) मतदारसंघासाठी भाजपकडे (BJP) निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर, जिल्हा परिषदेच्या सभापती धरती देवरे, विलास बच्छाव, हर्षवर्धन दहिते तसेच राजवर्धन कदमबांडे, माजी मंत्री अमरीश पटेल आणि माधुरी बाफना हे इच्छुक होते. याशिवाय नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. जवळपास दहा इच्छुकांना डावलून डॉ. भामरे यांनी उमेदवारी मिळवली आहे.
महाविकास आघाडीत धुळे मतदारसंघ काँग्रेस पक्षाला देण्यात आला होता. काँग्रेस पक्षाकडे धुळ्यामध्ये प्रभावी उमेदवाराची वानवा होती. त्यामुळे पक्षाने सातत्याने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू ठेवला होता. आता डॉ. भामरे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.
भाजपकडे इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी आता काँग्रेसकडे उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये याबाबत ठोस घडामोडी झालेल्या दिसतील आणि एक नवे नाव उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने काँग्रेसच्या नेत्यांनी आपली मानसिकता केली आहे. त्यामुळे धुळे मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने उमेदवारासाठी चाचपडणाऱ्या काँग्रेसला आयती संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
धुळे मतदारसंघात नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मालेगावमध्ये मालेगाव बाह्य आणि धुळे शहर मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे धुळे निवडणुकीच्या निकालात मालेगाव शहर आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघाचा मोठा प्रभाव पडतो. त्या दृष्टीने नाशिकचा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.