PM Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार साताऱ्यातील कातकरी समाजाशी संवाद...

PM Janman Yojana : 'पीएम जन मन'च्या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने चर्चा करणार असल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती.

Amol Sutar

Satara Political : जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री 'जन मन' योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 845 कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत सोमवार दि. 15 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने प्राधान्य क्रमाने घेतला आहे.

यासाठी 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री 'जन मन' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान सातारा जिल्ह्यात नऊ तालुक्यातील 71 ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील 845 कातकरी कुटुंब वास्तव्यास असलेल्या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड, जातीचा दाखला, घरकुल, रस्ते, पिण्याची पाणी इत्यादी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील 845 लाभधारक कुटुंबांशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्यावतीने मेढा, तालुका जावली येथील ‘कलश मंगल कार्यालयात’ ऑनलाईन कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. कार्यक्रमासाठी पात्र लाभधारक कुटुंबांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT