Shahu Maharaj meet Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Farmer Protest : शेट्टींनाही 12 हत्तींचे बळ; शाहू महाराजांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत दिला पाठिंबा

Kolhapur News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे.

Rahul Gadkar

kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवार (ता. 23 नोव्हेबर) सकाळपासूनच पुणे-बेंगलोर महामार्ग रोखून धरला आहे. मागील हंगामातील 100 रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी ठाम आहेत. तब्बल सहा तासांहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. (Shahu Maharaj meet the protestors of Swabhimani Shetkar Sangathan)

श्रीमंत शाहू महाराज यांनी दोन आठवड्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुणे-बेंगलोर महामार्ग पंचगंगा पुलावर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्रीमंत शाहू महाराज यांनी आपल्या आंदोलनकर्त्याची भेट घेतल्याने स्वाभिमानी संघटनेला बारा हत्तीचे बळ मिळाल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. राज्य सरकार आणि कारखानदारांनी या प्रश्नाची योग्य दखल घेतली पाहिजे. आजच्या आज यावर तोडगा निघाला पाहिजे, असे या वेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितले.

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे १०० रुपये देण्यास तीन-चार कारखाने तयार आहेत. मात्र कारखानदारांकडून लेखी प्रस्ताव आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतल्याचे सांगितले. श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन कार्यालयात जाऊन कारखानदारांचे प्रस्ताव खात्रीशीर बघावेत. ते आल्यानंतरच आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानीचे दोन प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात

दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज यांनी आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर ते स्वतः, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित हे या प्रस्तावाची पडताळणी करायला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

महामार्गावरच बसली जेवणाची पंगत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सकाळपासून आंदोलनात सहभागी झालेले आहेत. दुपारी चार वाजता त्यांनी भात आमटी शिजवून रस्त्यावरच पंगत बसवली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाच्या निमित्ताने मोठी जेवणाची पंगत बसलेली पहायला मिळाली. जवळपास तीन हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी या जेवणाचा लाभ घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT