Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊसदरावरच्या आंदोलनावर तोडगा न निघाल्यामुळे आता अधिकच आक्रमक पवित्रा धारण केले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा चक्का जाम आंदोलन सुरू झाले आहे. जोपर्यंत सरकार आणि कारखानदार निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आता राजू शेट्टी यांनी आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. (Latest Marathi News)
पुणे - बंगळुरू महागार्गावर मोठा पोलिस फौजफाटा आहे. स्वत: राजू शेट्टी यांनी महामार्ग बंद करत सरकारला इशारा दिला आहे. शेट्टी म्हणाले, "काल रात्रीपासून माझ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फांद्या छाटल्यानंतर इथे कोण येणार असं त्यांना वाटत होतं, पण माझा शेतकऱ्यांवर विश्वास आहे. तो त्यांनी सार्थ ठरवलेला आहे. मला एकटं पडू दिलेलं नाही."
सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. कारखानदारांकडे पोलिस बंदोबस्तात ऊस आणण्यासाठी प्रवृत्त करत आहे. सरकार आणि कारखानदार मिळालेले आहेत. म्हणून आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली आहे. सरकारने आंदोलन मोडून काढायचं ठरवलं आहे. दीड महिना झाला आम्ही लढतोय. विरोधी पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही, आता हातामध्ये उसाचा बुडका घ्या आणि लुंग्या-सुंग्यांचा यांचा बंदोबस्त करायला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टींनी घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंदोलनापूर्वी शेट्टींचे श्री अंबाबाईला साकडे -
आंदोलन सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या घामाला दान मिळू दे! बळीराजाच्या झोळीत त्यांची हक्काचे पैसे मिळू दे!. त्यासाठी कारखानदारांना सुबुद्धी दे!, असे साकडे राजू शेट्टी यांनी घातले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.