Gems & Jewelery Park : महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार?; उद्योगमंत्र्यांनी ‘जेम्स आणि ज्वेलरी’बाबत दिली मोठी अपडेट...

Uday Samant News : देशातील सर्वांत मोठा जेम्स आणि ज्वेलरी पार्क हा नवी मुंबईमध्ये होतो आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarbana
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्रातून वेदांता फोक्सकॉन या प्रकल्पासह तीन मोठे उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या आरोपातून राज्यात मोठा गदारोळ उठला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात येत होता. मात्र, आता मुंबईतील जेम्स आणि ज्वेलरी प्रकल्पही गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. मुंबईतील जेम्स आणि ज्वेलरी प्रकल्पाबाबत जे काही बोललं जात आहे, हे धादांत खोटे आहे. (Gems and Jewelery Park will not go to Gujarat : Industries Minister Uday Samant)

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी ते नागपूरच्या दोन्ही विभागाचा औद्योगिक आढावा घेणार आहेत. तसेच, सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार गडचिरोलीमध्ये करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीबाबत चर्चा करणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाचे विधिमंडळाला पत्र

मुंबईतील जेम्स आणि ज्वेलरी प्रकल्पाबाबत जे काही बोललं जात आहे. हे धादांत खोटे आहे. देशातील सर्वांत मोठा जेम्स आणि ज्वेलरी पार्क हा नवी मुंबईमध्ये होतो आहे. त्या उद्योगात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे जवळपास ५० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. अंधेरीमध्ये त्या प्रकल्पाचे मुख्यालय आहे, त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आलो. एखादा उद्योजक आपला उद्योग विस्तार करण्यासाठी गुजरातमध्ये गेला तर याचा अर्थ जेम्स आणि ज्वेलरीची संपूर्ण यंत्रणाच तिकडे गेली, असा होत नाही. त्यामुळे जेम्स आणि ज्वेलरीचा मोठा पार्क नवी मुंबईमध्ये होणार आहे, असेही सांत यांनी पुन्हा एकदा सांगितले.

Uday Samant
Nagpur Winter Session 2023 : नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय कोणत्या गटाला मिळणार; विधिमंडळासमोर पेच...

मागील अधिवेशनात आम्ही राज्यातील उद्योगाची श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. त्यात तीन उद्योगांबाबत बोंबाबोंब केली जाते. ते तीनही प्रकल्प आमच्या सरकारच्या कालावधीत गेले नाहीत, हे श्वेतपत्रिकाच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. त्या श्वेतपत्रिकेच्या विरोधात जाऊन अजून कोणाला पुरावे द्यायचे असतील तर ते उद्योग विभागाकडे सादर करावेत, असे मी तीन महिन्यांपूर्वी आवाहन केले होते. पण, कोणाकडेही पुरावा नसल्यामुळे आम्ही जी श्वेतपत्रिका (व्हाइट पेपर) काढली आहे, ती अधिकृत आहे. कुठलाही प्रकल्प आमच्या सरकारच्या काळात गेलेला नाही, असाही दावा उद्योगमंत्र्यांनी केला.

सामंत म्हणाले की, वेदांता फोक्सकॉन हा प्रकल्प आता गुजरातमध्येही होतो की नाही, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे, असे विधान उद्योगमंत्री सामंत यांनी केले आहे. त्यामुळे वेदांता फोक्सकॉन हा प्रकल्प निवडणूक जुमला होता की काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होते. तो तिकडे गेला नाही तर महाराष्ट्रात परत येणार का, हाही प्रश्न आहे.

उद्योगमंत्री म्हणाले की, पन्नास खोक्यांचा आरोप कुठेही रेकॉर्डवर आलेला नाही. पन्नास खोक्यांचा आरोप हा पूर्वीपासून राजकीय होता. महाराष्ट्राला मोठी राजकीय परंपरा आहे. वसंतदादा पाटील यांच्यापासून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यापर्यंत अनेकांचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे. पण यातील एकाही नेत्याने असा आदळआपटपणा केलेला नव्हता. सत्ता, मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपद गेल्यामुळे काही लोकांचा आमची बदनामी करणं, हा एकच उद्देश राहिला आहे. पण त्याला काही अर्थ नाही.

Uday Samant
Chandrakant Khaire News : लोकसभेची उमेदवारी मला मिळावी ही तर जनतेचीच इच्छा...

अजित पवार जेव्हा युतीमध्ये सामील झाले, तेव्हा गद्दार आणि खोके याला फुलस्टॉप मिळालेला आहे. आम्हाला हे लोक गद्दार म्हणतात, मग अजितदादांच्या भूमिकेबाबत हे काय बोलतील, असा सवालही सामंत यांनी केला.

Uday Samant
Thackeray Group : ठाकरेंची पवारांवर कडी; रायगडमधून लोकसभेसाठी अनंत गीतेंच्या नावाची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com