Sambhaji Raje Chhatrapati and Shahu Maharaj Chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahu Chhatrapati News : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवर शाहू छत्रपतींनी व्यक्त केली तीव्र नाराजी, म्हणाले...

Shahu Chhatrapati on Vishalgarh Encroachment : जिल्हा पोलीस आणि राज्य सरकारवरच केले आहेत आरोप, जाणून नेमकं काय म्हणाले आहेत?

Rahul Gadkar

Vishalgad Encroachment and Shahu Chhatrapati News : किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेनंतर आता विशाळगडावर झालेल्या घटनेचा आणि हिंसाचाराचा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिवाय पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचा ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत परिपत्रक काढत त्यांनी घटनास्थळावर भेट देऊन जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही केली आहे.

खासदार शाहू महाराज छत्रपती(Shahu Maharaj Chhatrapati) यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. राजर्षीं छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्हयात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे.

यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड़ प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घड़वून आणावी, अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या.'

परंतु, 'राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते, तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी.' अशी मागणी शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे.

याशिवाय, 'माजी खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhaji Raje Chhatrapati) यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो. हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. उद्या (मंगळवारी) आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे.' असंही शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.

तसेच 'विशाळगडावरील(Vishalgarh ) अतिक्रमण सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये. अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिले आहेत.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT