Solapur, 13 February : संजय राऊत म्हणजे सकाळी सात वाजता वाजणारा भोंगा आहे. राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘निर्लजम् सदासुखी’ माणूस आहे. महाराष्ट्राची परंपरा, राजकीय संस्कृती ही वेगळी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चांगलं उदाहारण म्हणून याकडे पाहायला हवे होते. पण, राऊतांनी अत्यंत खालच्या स्तराने याकडे पाहिले आहे. आज राऊत हे पवारांविषयी बोलायला लागले आहेत. मात्र, ‘पवारसाहेब हे राजकारणाच्या विद्यापीठाचे कुलगुरु आहेत आणि संजय राऊत हे अंगणवाडीत खेळणारा एक वात्रट पोरगा आहे,’ अशा शब्दांत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागले.
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येत्या सहा महिन्यांत कोणीही राहणार नाही. टप्पाटप्प्याने सर्वजण शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील. उद्धव ठाकरे हे राऊतांच्या नादाला लागल्याने एकाकी पडतील.
साहित्य संमेलन म्हणजे मराठी सारस्वतांचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ असतं, त्यामुळे साहित्य संमलेनाच्या संदर्भाने दलाल हा शब्द वापरणे, हे फक्त महामुर्ख माणसालाच शक्य आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे साहित्यीकाला जे काही बोलले आहेत, ते अत्यंत किळसवाणं असं विधान आहे. ते महाराष्ट्राच्या परंपराला आणि संस्कृतीला न शोभणारं आहे, असाही दावा शहाजीबापूंनी केला.
माजी आमदार पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ‘जय महाराष्ट्र’ म्हणत होते की ‘जय गुजरात’ म्हणत होते, हे अगोदर सांगावे. विनायक राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोणतीही राजकीय गोष्ट सध्याच्या काळात केलेली नाही. त्यांनी फक्त एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याचं राऊतांना वाईट वाटत असेल तर या पिसाळलेल्या लोकांना शिंदे यांचे राजकारणातील यश पचत नाही, हे यावरून दिसून येतं.
शिंदे गटाकडे येणारे खासदार पक्षात राहावेत, यासाठी आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा आहे. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. महाविकास आघाडी ही संपल्यात जमा आहे, ते थोड्याच दिवसांत जाहीर होईल, असाही दावा शहाजीबापू यांनी केला.
पवारांचा सल्ला घेण्यात काय वावगं
उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली, ती साहित्य संमेलनाच्या संदर्भाने घेतली आहे. पण, राजकीय चर्चा झाली असली तरी पवार हे राजकारणातील मोठं व्यासपीठ आहे. त्यांचा एखाद्या गोष्टीवर सल्ला घेणं, यात काहीही वावगं नाही, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
राजन साळवींच्या प्रवेशाबाबत वर्षभरापासून चाललं होतं.
राजन साळवी यांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशासंदर्भात एक वर्षभरापासून चाललं होतं. पण, त्यांच्याकडे होत असलेल्या भावनिक आग्रहापोटी ते आतापर्यंत थांबले होते. साळवी हे आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे नेते आहेत आणि शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.