Shivsena News : शरद पवार यांना राजकारण कळत नाही, असं म्हणणारा कोणीतरी वेडाच असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात राहून देखील संजय राऊत सारख्या माणसाला हे कळत नाही, म्हणजे तो किती बिनडोक असले, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शरद पवारांच्या हस्ते झालेल्या सत्कारनंतर जाहीर केलेल्या नाराजीवर टीका केली.
शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंचे कुटुंब फोडले आणि आता पक्षाचा अंत जवळ आला, तरी संजय राऊत (Sanjay Raut) या माणसाला उद्धव ठाकरे दूर करायला तयार नाहीत. काही बोलत नाही, यावरून उद्धव ठाकरे यांचे असे कोणते गुपित राऊत यांच्याकडे आहे, की ज्यामुळे ते अजूनही पक्षात आहेत? याचा शोध घेतला पाहिजे, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. विशेषतः खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार साहेब आम्हालाही राजकारण कळते असे म्हणत,एकनाथ शिंदे यांचा सत्कार तुम्ही करायला नको होता, अशी नाराजी व्यक्त केली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊत यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत हे बिनडोक असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांना राजकारण कळत नाही? असे जर संजय राऊत म्हणत असतील तर तुम्हाला नेमकं राजकारण कळतं का? हा खरा प्रश्न आहे. तुम्ही कधी महापालिकेची निवडणूक लढला आहात का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात राहून तुम्ही एवढे बिनडोक कसे राहिलात? आत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमच्या कशावर लाथ मारून तुम्हाला हाकलून दिले असते याचा विचार करा. संजय राऊत याच माणसामुळे शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली एवढेच नाही तर ठाकरे कुटुंबही फुटले
एवढं होऊनही उद्धव ठाकरे यावर काहीच बोलत नाही, राऊत यांच्यावर काही कारवाई करत नाही. यावरून उद्धव ठाकरे यांचे असे काही तरी गुपीत संजय राऊत यांच्याकडे असले पाहिजे, ज्यामुळे ते राऊत याला थांबवायलाच तयार नाही. नेमकं हे गुपित काय याचा शोध आता घेतला पाहिजे? असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याचा सन्मान होतो याचा शिवसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे.
'उबाठा'च्या विरोधात बोलणारा मग तो कोणीही असो आज गद्दार ठरवला जातो. शिंदेंचे कौतुक करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांनाही फोन करून तुम्ही नाराजी व्यक्त करता यावरून तुम्ही किती कोत्या मनाचे आहात हे स्पष्ट होते. 'उबाठा' गट आता संपत आला आहे. महाविकास आघाडीत या पक्षाला आता कुठलेही स्थान राहिलेले नाही. काँग्रेस यांना विचारत नाही, राष्ट्रवादीचा कोणी नेता मातोश्रीवर गेल्याचे तुम्हाला आठवते का? उलट हेच कधी सिलव्हर ओक, तर कधी दिल्लीत जाऊन लाचारी करत आहेत, असेही शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.