Eknath Shinde, Nana Patekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shinde group politics : मुख्यमंत्री - नानांच्या साताऱ्यातील नौका विहाराने राजकीय 'तरंग'

Koyna water tourism launch : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते.

Amol Sutar

Satara News : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय हलचालींना वेग येत आहे. महाराष्ट्रात अद्याप सर्वच पक्षाचे जागावाटप अधांतरीत असले तरी नवख्या आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी मात्र अजूनही सुरुच आहे. उमेदवार आणि मतदारसंघाच्या आदलाबदलीने सत्ता कशी राखता येईल याकडे महायुतीचे लक्ष आहे.

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शिरुर लोकसभेसाठी ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे अजित पवार गटाकडून नाव चर्चेत असल्याचे सूचक विधान केले होते. त्यातच काल (ता. 9) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत नाना पाटेकर साताऱ्यातील कार्यक्रमानिमित्त कोयना जलाशयात नौका विहार करताना दिसले. त्यांच्या या नौका विहाराने मात्र राजकीय 'तरंग' निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.

सातारा (Satara) जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर (Nana Patekar) प्रमुख उपस्थितीत दिसले. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही उपस्थिती होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा झाली असून अजित पवार गटाकडून उमेदवारीची चर्चा असताना शिंदे गटाच्या कार्यक्रमात नानांनी लावलेली प्रमुख उपस्थिती बरच काही सांगून गेली.

पुण्यातील शिरूर हा शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही जोरदार तयारी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिरूर मतदारसंघातून अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता असून, चाचपणी सुरू आहे.

यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारणा केली असता. ‘नाना आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं आहे. अभिनेते नाना पाटेकर हे मात्र शिरूर मतदारसंघातून लढण्यास फारसे उत्सुक नसले तरी त्यांच्या या विधानाने चर्चेची पाल चुकचुकत आहे. अद्याप नानांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसल्याने ही फक्त शक्यताच असल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या कोयना जल पर्यटन शुभारंभ कार्यक्रमास नानांनी हजेरी लावली. तसेच कोयना जलाशयात नौका विहारही केला. त्यामुळे नाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारी घेतील की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आता कोणता निर्णय होतो, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT