Nitin Banugade - Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आज कुठे चाललाय ? प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांचा सवाल..

lecture on "Maharashtra Yesterday, Today Tomorrow" held at Patan : एवढे मोर्चे निघत असतील तर तुम्ही कोणासाठी कोणाचे राज्य चालवताय ; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याकडून विचारणा..

Vishal Patil

Satara Political News : दिल्लीचे तख्त हलवणाऱ्या महाराष्ट्रातील आमचा शेतकरी आज कुठे आहे. दररोज दहा ते बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकर्‍यांच्या पिकाला हमीभाव नाही, असे असंख्य प्रश्न बाजूला पडले आहेत‌. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. धरणग्रस्त, आदिवासींना मोर्चे काढावे लागत आहेत. तर नागपुरला 100 मोर्चे गेले.

ज्या देशाला राज्याने दिशा दिली ते राज्य आज कुठे चालले आहे. एवढे मोर्चे निघत असतील तर तुम्ही कोणासाठी कोणाचे राज्य चालवताय, असा सवाल शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते आणि सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी उपस्थित केला. पाटण (Patan) येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या प्रांगणात आयोजित "महाराष्ट्र काल, आज उद्या" या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

ते म्हणाले, मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्र खिळखिळा करण्याचा डाव आखला जात आहे. एका झालेल्या सर्वेक्षणात तर महाराष्ट्र भ्रष्टाचारात पुढे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुठे आहेत सरकारच्या योजना ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. आत्महत्यात सुद्धा महाराष्ट्र नंबर एकवर आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ साहित्यिकांनी सुरु केली.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा पवित्र मंगल कलश आणला. महाराष्ट्रात साखर कारखाने, सुतगिरण्या, शिक्षण संस्था, सहकारी संस्था, उभ्या राहिल्या, महाराष्ट्र समृद्ध झाला. मुंबई हा महाराष्ट्राचा प्राण आहे, पण आज मुंबई खिळखिळी करण्याचे काम सुरु आहे. पुढच्या पिढीने जागृत व्हावे लागेल‌. सध्या नोकऱ्यांची वाणवा झाली आहे तर केंद्रात आणि राज्यात खासगीकरण सुरू झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुर्वी मतपेट्या पळवायचे आता पक्ष, आमदार..

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना एकही उद्योग महाराष्ट्रा बाहेर गेला नाही. आता महाराष्ट्र उध्वस्थ करायचे काम चालले आहे. पुर्वी मतपेट्या पळवायचे, आता आमदार, पक्ष पळवायला लागलेत. आता कुठे लोकशाही आहे ? सध्याचे राजकारण विकास शुन्यतेने चालले आहे. पुर्वी आग पेटविण्यासाठी दगडावर दगड घासायचे.

पण आज जातीवर जात घासून आग पटवली जात आहे, हे दुर्दैव आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी उभे राहणे ही काळाची गरज आहे. दिल्लीच्या तख्ताला धडक देणारा महाराष्ट्र संपणार नाही संपवत असतो, अशा भावना बानुगडे - पाटील यांनी व्यक्त केल्या.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT