Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Thackeray group strategy: मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाचे मोठे प्लॅनिंग; निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'या' 12 उपनेत्यांवर सोपवली विशेष जबाबदारी

BMC elections 2025 News : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाचे मोठे प्लॅनिंग; निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 'या' 12 उपनेत्यांवर सोपवली विशेष जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. मात्र, शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी पडलेल्या उभ्या फुटीनंतर महापालिकेतील अर्ध्यापेक्षा जास्त माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत हा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे असणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसापासून महापालिका निवडणुकीसाठी मायक्रोप्लॅनींग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पक्षाच्या 12 उपनेत्यांवर ही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी वेगवेगळी रणनीती उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या पक्षाकडून केली जात आहे. महापालिकेचा गड राखण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेणार का? अशी चर्चा रंगत असली तरी दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्षाकडून युद्धपातळीवर निवडणुकीचे प्लॅनिंग केले जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांना मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार अमोल कीर्तीकर यांच्याकडे दहिसर, बोरिवली, मागाठाणे तर उद्धव कदम यांच्याकडे चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम, विलास पोतनीस यांच्याकडे दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, विश्वनाथ नेरूरकर यांच्याकडे वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम तर रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिमची जबाबदारी असणार आहे.

गुरुनाथ खोत यांच्याकडे चांदिवली, कलीना, कुर्ला, नितीन नांदगावकर यांच्याकडे विक्रोळी, भांडुप, मुलुंड, सुबोध आचार्य यांच्याकडे घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर - मानखुर्द, मनोज जमसूतकर यांच्याकडे अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा, अरुण दूधवडकर यांच्याकडे धारावी, माहीम, वडाळा, अशोक धात्रक यांच्याकडे वरळी, दादर, शिवडी, सचिन अहिर यांच्याकडे मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाकडून मुंबईतील सर्वच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी या उपनेत्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीच्या कामाला वेग येणार आहे. दुसरीकडे आगामी निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबत एकत्र येऊन लढणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. दुसरीकडे मनसे व शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असल्याने नेमकी शिवसेना ठाकरे गट काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT