Uddhav Thackeray addressing senior Shiv Sainiks during the foundation day event, launching a sharp attack on BJP and Shinde. The moment captures intense Maharashtra politics discourse. Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena restructuring : उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन' तयार! पक्षबांधणीसाठी संघटनात्मक सर्जरी; बड्या पदाधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात?

Political News : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने आता उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत सपाटून मार खावा लागला आहे. विशेषतः मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेची 25 वर्षापेक्षा अधिककाळ सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने आता उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. त्यासाठी संघटनात्मक सर्जरी करण्यात येणार असून त्यामुळे अनेक दिवसापासून एकाच पदावर असेलल्या बड्या पदाधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

राज्यात गेल्या वर्षभराच्या काळात विधानसभा, महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. 2029 मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे या प्रादेशिक पक्षांनी संघटनात्मक बदल करत, पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (Shivsena) ऍक्शन मोडवर आली आहे. या महत्वाच्या नेत्यांवर जबाबदारी देताना काम करणार, तोच यापुढे पदावर राहणार, असा इशाराही त्या-त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संबंधितांना दिला आहे. आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेतही हालचालींना वेग आला आहे.

पक्षबांधणीच्या दृष्टीने आता उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे. शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक झाली. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची बैठक घेतली आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखांना भेटी देणार आहेत.

येत्या काळात संपूर्ण राज्यभरात पक्षबांधणीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना लवकरच स्थानिक पातळीवर बदल करण्याच्या तयारीत आहे. पदावर असून कोणाच्या दबावामुळे जर काम करता येत नसेल तर, त्यांना पदापासून दूर करून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. त्यामुळे आता पक्षात येत्या काळात काय बदल केले जाणार याकडे लकाझ लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे पक्षबांधणीसाठी संघटनात्मक सर्जरी करण्यात येणार आहेत. त्यासोबतच बड्या पदाधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात? आली आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्या बड्या नेत्यांना डच्चू दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT