Mumbai News : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीदरबारी हालचालींना वेग आला आहे. विस्तारासोबतच मंत्र्यांची खांदेपालट केली जाणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोंहचली आहे. त्यातच आता राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या प्रवेश करणाऱ्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला वाजणार आहे. या विस्तारात महाराष्ट्रातील दोन खासदारांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांचे खाते देखील ठरले असल्याचे समजते.
जुलै महिन्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयातच शपथविधीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या सेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 6 खासदारांनी प्रवेश केला आहे. त्या सहापैकी एका खासदाराचे नशिब उजळणार असून त्यांचा थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
त्यासोबतच ठाकरे सेनेतील 6 खासदार एनडीएमध्ये आणल्याबद्दल शिवसेनेला (Shivsena) बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार सोपविण्यात येणार असल्याचे समजते. शिंदे यांच्यासोबतच परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर शिवसेनेचे पूर्वीचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केवळ आयुष खाते राहण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांची वर्णी लागल्यास त्यांच्याकडे अर्थखाते सोपवले जाऊ शकते. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मनुष्यबळ विकास खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे.
या दरम्यान अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनुराग ठाकूर यांचे कॅबिनेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. राज्यातील बंड करणाऱ्या सहा खासदारांपैकी एका खासदाराची वर्णी थेट केंद्रात मंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय देखील झाला आहे. त्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या गटात सहा खासदारांनी प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.