Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : जळगाव मतदारसंघात भाजपला धक्का; सर्व्हेमध्ये दडलंय काय ?

BJP Vs Shinde Group News : एकनाथ शिंदे गटाचा जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा; उमेदवाराचा शोध सुरू

संपत देवगिरे

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. त्यांना भाजपने उमेदवारीचे संकेत दिले आहेत. मात्र, त्याला थेट सहकारी पक्ष शिंदे गटानेच अपशकून केला आहे. शिंदे गटाने या जागेवर उमेदवार देणार असल्याचा दावा केला आहे. (Eknath Shinde group's claim on Jalgaon Lok Sabha constituency)

जळगावला भाजपचा खासदार आहे; परंतु एका माध्यमाने केलेल्या सर्व्हेत जळगाव मतदारसंघात भाजपचा उमेदवार पिछाडीवर गेला आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठी असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर दावा करीत आहोत, असे शिंदे गटाचे नेते नीलेश पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अशातच सहकारी पक्षांच्या वाढत्या अपेक्षांनी भाजपची डोकेदुखी वाढू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने जळगाव मतदारसंघावर दावा सांगितला आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील सर्व्हेमध्ये मागे पडल्याचा त्यांचा दावा आहे.

राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महायुती आहे. तीनही पक्ष एकत्रित लोकसभेच्या निवडणुका लढणार, असे सांगत आहेत. त्यातही जळगावच्या दोन्ही जागांवर भाजपचे खासदार आहेत. त्याला आता सहकारी पक्षाकडूनच अपशकून होऊ लागला आहे

त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी वरिष्ठ स्तरावर जागावाटपाची चर्चा होते आहे. त्यात आम्ही मागणी केल्याप्रमाणे जळगाव मतदारसंघात उमेदवार देणार असून त्याला वरिष्ठांनी सहमती दिल्याचाही दावा केला आहे.

जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू आहे. विधानसभानिहाय बैठका सुरू आहेत. पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या 27 डिसेंबरला मेळावा होणार होता पण, तो रद्द झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची मोठी ताकद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत तर भाजपचे केवळ दोनच आमदार आहेत. अमळनेर, चाळीसगाव तालुक्यांतही पक्षाची ताकद असून जळगाव शहरातही आम्ही बलवान आहोत. पंचायत समिती स्तरावरही आमची ताकद मोठी आहे. पारोळा, पाचोरा तालुक्यांतील 15 पंचायत समित्या आमच्या ताब्यात होत्या. आमच्या ताकदीच्या बळावर आम्ही मागणी करीत आहोत. त्याला वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT