Jode Movement Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Political News : भाजप युवा मोर्चाकडून प्रियांक खर्गेंना 'जोडे'...

Pradeep Pendhare

Nagar Political News : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल प्रियांक खर्गे यांच्याविषयी नगर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेदेखील या संतापाचे धनी ठरू लागले आहे. भाजप युवा मोर्चाकडून श्रीरामपूरमध्ये प्रियांक खर्गे यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे.

भाजप BJP युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर आणि शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. श्रीरामपूर Shrirampur मधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे पदाधिकारीदेखील आंदोलनात सहभागी झाले होते. "देशामध्ये काँग्रेसने कायम छोटा विचार पेरला. काँग्रेस Congress कडे छोट्या विचारांचेच नेते आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे देशभक्तांबदल अपशब्द वापरत असतात. काँग्रेसची ही एक प्रवृत्ती झाली आहे. प्रियांक खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांना ठेचण्याचे काम जागरूक नागरिकांनी केले पाहिजे", असे शहराध्यक्ष रूपेश हरकल यांनी म्हटले. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित मुथ्था यांनी ही तीव्र शब्दांत प्रियांक खर्गे यांचा जाहीर निषेध करत कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी Rahul Gandhi यांनीदेखील सावरकर यांचा अपमान केला होता. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. याचपद्धतीने खर्गेंवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस योगेश ओझा, उपाध्यक्ष प्रतीक वैद्य, भाजपचे बाळासाहेब हरदास, सावरकर प्रतिष्ठानचे अमित मुथ्था, सचिन अजगे आंदोलनात सहभागी झाले होते.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT