MLA Monika Rajale, Pratap Dhakane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar News : भाजपचे आमदार आणि शरद पवार गटाचे सरचिटणीस यांच्यात 'कलगीतुरा'...

Pathardi Accusation On Road Work : पाथर्डी तालुक्यात रस्त्याच्या कामावरून अॅड. प्रताप ढाकणे, आमदार मोनिका राजळे यांच्यात झडल्या आरोपांच्या फैरी.

Pradeep Pendhare

Nagar News : पाथर्डी तालुक्यातील करोडी-टाकळीमानुर रस्त्याच्या कामावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे आणि भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ढाकणे यांनी राजळे यांची राजकीय घराणेशाही काढताच आमदार राजळे यांनी त्यावर झोपी गेलेले विरोधक, अशा शेलक्या शब्दांत टीका केली आहे. या दोघांत सुरू असलेला कलगीतुरा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

पाथर्डी तालुक्यातील बीड Beed राज्य महामार्गावर टाकळीमानुर ते करोडी या रस्त्याचे काम सुरू करावे आणि महावितरणचा असलेला गलथान कारभार सुधारावा, या प्रमुख मागण्यांसाठी ॲड. प्रताप ढाकणे Pratap Dhakane यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी ढाकणे यांनी भाजप आमदार मोनिका राजळे Monika Rajale यांचा नामोल्लेख टाळून जोरदार टीका केली. पाथर्डी तालुक्यातील राजकारण गेल्या २० ते २५ वर्षांपासून एका घरण्याभोवती फिरते आहे.

तरीदेखील या तालुक्यात एकही भरीव काम झालेले नाही. साधा पाण्याचा प्रश्नदेखील सोडवता आलेला नाही. या लोकप्रतिनिधीच्या काळात एक जरी तलाव तालुक्यात निर्माण झाला असल्यास राजकारण सोडून देऊ, असे ढाकणे यांनी म्हटले. भाजप आमदार मोनिका राजळे यांनी ढाकणे यांच्या या टीकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. करोडी-टाकळीमानुर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. तांत्रिक कारणामुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळाला नाही.

ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर प्रशासकीय आदेश मिळून रस्त्याचे काम सुरू होईल. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विरोधक मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. कामाचे श्रेय लाटण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सत्ता असताना झोपलेले विरोधक सत्ता गेल्यावर जागे झाले, अशी जोरदार टीका आमदार राजळे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या रस्त्यासह मतदारसंघातील इतर रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सामावेश करावा, यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी एकाही रस्त्यासाठी निधी मंजूर केला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला असता, त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे विरोधक राजकीय स्वार्थासाठी मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भांडवल करून रास्ता रोको आंदोलन, तसेच समाज माध्यमांवर, उलट-सुलट चर्चा, पोस्ट व कॉमेंट्स करून मंजुरीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT