Vijay chaudhary sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangali Political News : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींनी लोकसभेसाठी दंड थोपटले

Umesh Bambare-Patil

Sangali Political News : सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लोकसभेसाठी उठाबशा काढायला सुरुवात केली आहे, तर डीवायएसपी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींनीदेखील संधी मिळाली तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र केसरी लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याने राजकीय आखाड्यात धुरळा उडणार आहे.

विजय चौधरी Vijay chaudhary हे जळगाव Jalgaon जिल्ह्यातील सायगाव ता. चाळीसगावचे रहिवासी आहेत. कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना चितपट करून त्यांनी ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शासनाने 2017 मध्ये त्यांची गृहखात्यात डीवायएसपी पोलिस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली आहे.

सध्या ते पुणे येथे सेवेत आहेत. पोलिस उपअधीक्षक पदावर काम करीत असले तरी त्यांची कुस्तीची नाळ तुटलेली नाही. पोलिस खात्यांतर्गत झालेल्या जागतिक पोलिस कुस्ती स्पर्धेत चौधरी यांनी पदक मिळवले आहे. कर्तबगारीने अंगावर खाकी असली तरी खादीचे ग्लॅमर त्यांना खुणवू लागले आहे. त्यामुळे संधी मिळाली तर लोकसभा Loksabha निवडणूक लढवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अनेक मल्लांनी कुस्ती क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर राजकीय आखाड्यात आपली दुसरी इनिंग सुरू केली आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना यशदेखील मिळाले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचे खा. संजयकाका नेतृत्व करीत आहेत. संजयकाका हे पैलवान आहेत. सांगलीच्या भोसले व्यायामशाळेत त्यांनी लाल मातीत अनेक वर्षे सराव केला आहे.

सध्या सांगली लोकसभा मतदारसंघातून पैलवान संजयकाकाच्या विरोधात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दंड थोपटले आहेत. लोकसभेचे मैदान मारण्यासाठी त्यांनी दररोज गाठीभेटीचा सराव सुरू केला आहे. विजय चौधरींनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने संधी मिळाली तर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उन्मेष पाटील भाजपचे खासदार आहेत. चौधरी यांनी डाव टाकला आहे, त्यामुळे ते कसे मैदान मारतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT