Anurag Thakur in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anurag Thakur in Nashik : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची अनोखी 'डिनर डिप्लोमसी'; रात्री उशीरापर्यंत...

Anurag Thakur in Nashik : पंचतारांकीत हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला...

सरकारनांमा ब्यूरो

अरविंद जाधव :

Nashik News : मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनात अनेकदा आयोजकांचा मूळ हेतूच भरकटला जातो. कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दबावातून अनेकदा असे होते. विशेषत: कमी वेळेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन होणार असेल तर आयोजकांचा गोंधळ उडतो. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मात्र आपल्याला कार्यक्रमाच्या आयोजनातून काय साध्य करायचे हे सर्वांनाच दाखवून दिले. अनुराग ठाकूर यांनी रात्री कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या युवकांबरोबर अगदी सहजतेने जेवण घेतले. यानंतर युवकांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ठाकूर यांची ही डीनर डिप्लोमसी यामुळे चर्चेचा विषय ठरली. (Latest Marathi News)

राष्ट्रीय युवा अभियानाची सुरूवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला लाखो युवकांची उपस्थिती प्रत्यक्षात आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जंयतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात येते. याचे औचित्य साधत युवकांना आपल्या कला गुणांचे सादरीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अर्थात हा प्रशासकीय हेतू उदात्त असला तरी भाजपाचे अंतिम लक्ष युव वर्गाला पक्षाशी जोडणे हाच आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही याची जाणीव आहे.

11 तारखेला सांयकाळी दाखल झालेल्या ठाकूर यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर ते युवाग्राम या कार्यक्रमस्थळी पोहचले. तिथे जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. केंद्रीय मंत्री ठाकूर लागलीच मुलांसमवेत बसले. एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला. युवकांची आस्थेवाईक चौकशी केली.

रात्री उशिरापर्यंत ठाकूर यांनी वेगवेगळ्या गटातील युवकांशी संवाद साधत युवा ग्राममधील सोयी सुविधांचा आढावा घेतला. सेल्फीसाठी युवकांची चढाओढ लक्षात घेता कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दरम्यान, राज्यातील मंत्री व स्थानिक आमदारांनी ठाकूर यांचे अनुकरण करण्यास काय हरकत आहे, असा प्रश्नही उपस्थित होतो.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT