Narayan Rane, Chandrashekhar Bawankule, Nitesh Rane, Chhagan Bhujbal sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : भाजपचे बाहुले बनलेले 'ते' चार नेते कोण?

Sampat Devgire

Dhule Maratha Politics: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाच्या बदनामीसाठी काही मंत्री आणि नेत्यांना पुढे केले आहे. असे राजकारण करून मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या पक्षाला महागात पडेल. त्याचे परिणाम निश्चितच राज्यातील सत्ताधार्यांना दिसतील असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसात राज्य सरकारने आणि सत्ताधारी पक्षाकडून मराठा आरक्षणाचे नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. भाजपचे नेते रोज नवे आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात राज्य सरकारने केलेल्या राजकारणावर अतिशय संतप्त भावना व्यक्त करण्यात आली. मराठा समाजाशी खेळण्याचा हा प्रयत्न वाईट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर अतिशय गंभीर आरोप केला. या पक्षाने आपले राजकारण साध्य करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना पुढे करून समाजात बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात जाती-जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय अयोग्य आहे. यथावकाश भाजपचे बाहुले बनलेल्या या चार नेत्यांना महाराष्ट्र नक्कीच त्यांची जागा दाखवेल असे यावेळी सांगण्यात आले. राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन घेण्यापूर्वी मराठा कुणबी समाजाला आरक्षण आणि सगेसोयरे या विषयावर कार्यवाही करण्यासाठीचे वातावरण निर्माण केले.

मात्र प्रत्यक्ष अधिवेशनात यापूर्वी अनेकदा अपयशी ठरलेली आरक्षणाची खेळी खेळण्यात आली. या आरक्षणाला पुन्हा भाजपचेच हस्तक न्यायालयात आव्हान देतील. पद्धतशीरपणे ते रद्द करतील. हे आजच्या युवकांना समजलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारची ही खेळी यशस्वी होणार नाही. सबंध समाज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी ठामपणे सहमत राहणार आहे. त्यामुळे भाजपने राजकारण करू नये, असे आवाहन करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी सकल मराठा समाजाचे नेते सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, भानुदास बागदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, मनोज ढवळे,किशोर वाघ, विलास पोकळे, बाळासाहेब ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी राज्य शासनातील सत्ताधारी मराठा आरक्षण या विषयावर जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिकेबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT