Devendra Fadnavis on Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News : सभा महायुतीच्या उमेदवारासाठी अन् फडणवीस भाषणात म्हणाले, 'पवारसाहेब आमच्या पाठिशी...'

Loksabha Election 2024 : विरोधक नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवंय? या देशाचा विकास कोण करु शकते?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

Deepak Kulkarni

Akola News: लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांची घोषणा, नाराजीनाट्य, हेवेदावे,आरोप -प्रत्यारोप यांनी राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे. त्यातल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणंच बदलून टाकली आहे.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहेत. तसेच भाजपकडूनही या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्येही शाब्दिक चकमकी झडू लागल्या आहेत.याचवेळी फडणवीसांनी भरस्टेजवरुन एक विधान केल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महायुतीचे अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी बुधवारी(ता.3) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. पण याचवेळी त्यांनी केलेल्या एका वाक्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

ते म्हणाले,आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पवारसाहेब आपल्या पाठिशी आहेत,असे विधान त्यांनी आपल्या भाषणात केले.त्यांचे हे विधान ऐकून क्षणभरासाठी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण पवारसाहेब म्हणजे कोण,अशी शंकेची पाल उपस्थितांच्या मनात चुकचुकली. एवढ्यात देवेंद्र फडणवीसांनी लगेच पवारसाहेब म्हणजे अजित पवार, असा खुलासा करुन टाकला.त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

विरोधक नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवंय? या देशाचा विकास कोण करु शकते?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

फडणवीस म्हणाले,आमचे शिंदेसाहेब, पवारसाहेब असतील,आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत.पवारसाहेब म्हणजे कन्फ्युजन नको. पवारसाहेब म्हणजे अजितदादा,असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तसेच आमचे महायुतीचे नेते अनुपच्या पाठिशी आहेत,आम्ही अनुपला विकासात मदत करणार आहोत.आमच्या संजय धोत्रेंनी 15 वर्षे विकास केला, पण अनुप हा रेकॉर्ड तोडेल. बापापेक्षा बेटा सवाई निघेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT