YuvaSena Leader Shiva Vazarkar  Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Yuvasena News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

YuvaSena Leader Murder : या घटनेने शहरात एकच खळबळ

संदीप रायपूरे

Chandrapur Breaking : चंद्रपुरात उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेना शहरप्रमुख शिवा वझरकर या 24 वर्षोय तरुणाची धार धार शस्त्राने हत्या करण्यात आली. गुरुवारी (ता. 25) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपुरातील तुकूम परिसरात अग्रवाल कोचिंग क्लासेस परिसरात झालेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्यापाही स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.(Police)

हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पस्ट झाले नाही. घटनेची माहिती कळताच शिवसैनिकानी धाव घेतली. त्यामुळे तणाव वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपुरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा वझरकर हे रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेसच्या बाजूला उभे होते.याचवेळी अद्यात आरोपींनी शिवावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्यात वझरकर गंभीर जखमी झाले. यावेळी रूग्णालयात दाखल केल्यानंतर वझरकर यांचा मृत्यू झाला.

वझरकर हे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग होता. घटनेनंतर वझरकर समर्थकांनी संशयित आरोपीच्या वाहनांची तोडफोड केली.

राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीवर हल्ल्याची ही विदर्भातील तिसरी घटना आहे. गोंदियातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक यांना मारण्यासाठी 40 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच नागपुरातील मांगरूळचे उपसरपंच गब्बर देवराव रेवतकर (वय 42) यांना गोळ्या घालण्यासाठी 4 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.

नेत्याच्या मुलाला अटक...

युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर हत्या प्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वी 'हाफ मर्डर'च्या केसमधून जामिनावर बाहेर आले होते.

मयत व आरोपी यामध्ये काही वाद झाला होता, त्याबाबत बोलण्याकरिता वझरकर हे आरोपीला भेटायला गेला होता.मात्र, त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला. या वादात युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात शिवा वझरकर जागीच मृत्यू झाला.

तुमसरमध्ये मोक्काच्या प्रकरणातील सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना 25 सप्टेंबरला घडली होती. या प्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात एका राजकीय नेत्याने चक्क आपल्या साळयाला नईमच्या खुनातील आरोपींना जिल्ह्याच्या बाहेर पळवून नेण्यासाठी सारथी बनविले होते. या सर्व घडामोडीत राजकारणाचे होत असलेले गुन्हेगारीकरण चिंतेचा विषय ठरत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT