Devendra Fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis secret : एकनाथ शिंदेंवर बंड करण्याची वेळ का आली? तीन वर्षानंतर सीएम फडणवीसांनी सांगितले गुपित

Eknath Shinde rebellion News : तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची चर्चा नेहमीच होत असते. त्याविषयी पहिल्यांदाच सीएम फडणवीस यांनी एका मुलाखतीप्रसंगी मत व्यक्त केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : शिवसेनेत तीन वर्षापूर्वी उभी फुट पडली होती. यावेळी शिवसेनेतील 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहटीला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. या बंडखोरीवरून एकमेकांवर आरोप केले जात असले तरी दुसरीकडे या बंडाबाबत नवनवीन खुलासे समोर येत असतात. त्यातच तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी का बंड केले ? याचे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुपित सांगितले आहे.

तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाची चर्चा नेहमीच होत असते. त्याविषयी आजपर्यंत सर्वच नेत्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. मात्र, या वर पहिल्यांदाच सीएम फडणवीस यांनी एका मुलाखतीप्रसंगी मत व्यक्त केले आहे. त्यावेळी विधान परिषदेची निवडणूक 21 जून 2022 ला झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन विधीमंडळाच्या बाहेर पडले. त्यांनी थेट सूरत मार्गे गुवाहाटीचा रस्ता पकडला. त्यांच्यासोबत 40 आमदारांनी उठाव केला होता.

ठाकरे पक्षफुटीसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत

मुलाखतीप्रसंगी सीएम फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'या बंडासाठी उद्धव ठाकरे आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. या पक्षफुटीसाठी आम्हाला ते दोष देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी यंत्रणाच अशी तयार केली होती. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी उठाव केला.

एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी शिंदेंना हे समजले की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापत आहेत. त्यासाठी ते सर्व प्रकाराच्या तडजोडी करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खाते होते. त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरेच घेऊ लागले होते, हे त्यांना आवडले नाही.

त्यासोबतच उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणे सुरूच ठेवले. याशिवाय एकनाथ शिंदेंची ही महत्त्वाकांक्षा होतीच. त्यामुळे त्यांनी हा उठाव केला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंचा आमदारांशी संपर्क तुटला होता

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या आमदारांशी असलेला संपर्क तुटला होता, ते ते मान्यच करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुद्धा खोके आहेत का? मग ते कमी आहेत का, तसे काहीच नाही. उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती, त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते, असेही फडणवीस म्हणाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आले होते. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण शिंदेंना बाहेर बसवण्यात आले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी हा उठाव केल्याचे सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT