Milind Deora Sarkarnama
मुंबई

Loksabha election 2024 : दक्षिण मुंबईसाठी देवरांचा शिंदेसेनेशी घरोबा; पण भाजप जागा सोडणार का?

Jui Jadhav

Mumbai News : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात वेगवान हालचालींना सुरू झाल्या आहे. काँग्रेसचा एक तरुण चेहरा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती. मिलिंद देवरा यांचं नाव समोर येतं होतं. आज त्यावर शिक्कामोर्तबही झाले, परंतु मिलिंद देवरा, यांनी भाजपमध्ये नाही तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Milind Deora joins Shindesena for Lok Sabha; But will BJP leave the seat?)

भाजप आणि शिवसेनेची युती होती, तेव्हा दक्षिण मुंबईत खासदार म्हणून अरविंद सावंत हे विजयी झाले होते. मात्र, दक्षिण मुंबईची जागा ही आधीपासूनच काँग्रेसची आहे आणि यंदाच्या निवडणुकीतही ती काँग्रेसला मिळावी, अशी मागणी देवरांची होती. परंतु अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जात होता. परंतु मिलिंद देवरा या जागेसाठी इच्छुक होते. काँग्रेसमधून जागा मिळणार नसल्याचं समजल्यावर ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिलिंद देवरा यांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिवसेना अरविंद सावंत यांच्या विरोधात ते मिलिंद देवरांना स्थान देण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे भाजपदेखील दक्षिण मुंबईसाठी आग्रही असल्याचं समजते.

भाजपकडून कुठलीही हमी नाही

दक्षिण मुंबईची जागा कोण लढवणार, याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे. अरविंद सावंत जे विद्यमान खासदार आहेत, त्यांचंच नाव महाविकास आघाडीकडून नक्की केलं जाणार आहे. मात्र, भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता दुसरीकडे ही जागा आपल्याला मिळावी, अशी देवरांची इच्छा आहे आणि म्हणून ते शिवसेनेत जात आहेत, अशी चर्चा सुरु आहे.

भाजपकडून शिवसेनेला कोणतीही हमी या जागेसाठी देण्यात आलेली नाही. तरीही अरविंद सावंत यांच्या विरोधात मिलिंद देवरांना उभं करण्यासाठी आता शिंदे गट तयार झाला आहे. दक्षिण मुंबईची ही महत्वाची जागा मानली जात आहे आणि त्यामुळे या जागेसाठी सगळेच पक्ष इच्छुक दिसून येत आहेत.

ठाकरेंच्या सभेमुळे देवरांचा निर्णय पक्का

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची 6 जानेवारीला गिरगावला सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी दक्षिण मुंबईवर आपला दावा केला आणि या पुढेही आपणच जिंकू, असा दावा त्यांनी केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी मिलिंद देवरा यांनी ही जागा आधीपासून काँग्रेसची असून त्यावर कोणीही दावा करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरूनच या जागेसाठी वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT