Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

BMC Mayor race : आदित्य ठाकरेंनी वाढवला मुंबईच्या महापौर निवडणुकीचा सस्पेन्स; म्हणाले, 'आमची नेतेमंडळी कामाला लागली...'

Mumbai Mayor election News : मुंबईच्या महापौर पदाबाबतचा सस्पेन्स माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढवला आहे. त्याबाबत त्यांनी आमची नेतेमंडळी कामाला लागले असल्याचे सांगत मोठे विधान केले आहे.

सरकारनामा ब्युुरो

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे काठावरील बहुमत आहे. त्यामुळे महायुतीचा महापौर होण्याची शक्यता आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. मुंबईचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच आता मुंबईच्या महापौर पदाबाबतचा सस्पेन्स माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढवला आहे. त्याबाबत त्यांनी आमची नेतेमंडळी कामाला लागले असल्याचे सांगत मोठे विधान केले आहे.

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मुंबईचा महौपार कोणत्या पक्षाचा होणार यावरुन चर्चा सुरू आहे. एकीकडे महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे काठावरील बहुमत आहे. त्यामुळे त्यांनी फॉर्म्युला ठरला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची तारीख आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे.

त्यातच महायुतीमधील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला सहयोगी गटासंदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे, मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लक्षवेधी आणि चर्चेत आहे. त्यातच, शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनीही, आमची तयारी सुरू आहे. तुम्हाला लवकरच त्याबाबत समजेल, असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, मी त्याच्याबद्दल आता बोलणार नाही. बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे, आता जे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर फोकस करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा, आमच्या पक्षाची लोक कामाला लागली आहेत, असे म्हणत आदित्य यांनी बीएमसी महापौर निवडणुकीचा सस्पेन्स वाढवला आहे.

महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत असले तरी, काही अपक्ष किंवा नाराज नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जाणार का? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT