Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar : अर्धवट अध्यक्ष अन् पार्टटाइम वकील; नार्वेकरांनी उडवली ठाकरेंची टर

Uddhav Thackeray : केलेल्या चुकांमुळे ठाकरेंवर पक्ष गमावण्याची वेळ

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : ठाकरे-शिंदेंच्या सत्तासंघर्षाच्या निकालाननंतर विरोधकांनी राहुल नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली आहे. नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणारी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेत काही पुरावे जनतेसमोर सादर केले. यानंतर नार्वेकरांनीही पत्रकार परिषद घेत दिलेल्या निकाल शंभर टक्के कोर्टाच्या चौकटीनुसार आणि खरा असल्याचा निर्वाळा दिला. तसेच ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांना जशास तसे उत्तरही दिले आहे.

विधानसभा अध्यक्ष म्हणून निकाल देताना राहुल नार्वेकर लवादाच्या भूमिकेत होते. मात्र त्यांनी निकाल देताना कोर्टाचे घालून दिलेली चौकट मोडल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. यावर टीका करताना ठाकरेंनी लवादाला लबाड, निवडणूक आयोगाला चोर, तत्कालीन राज्यपालांना फालतू असे शब्द वापरले. त्यांच्या आरोपांना आधार असो वा नसो, पण लोकशाहीसाठी हे घातक आहे. ठाकरेंना संविधान संस्थांवर विश्वास नाही, त्यांचा संविधानावर तरी कसा विश्वास असेल, असा प्रश्न नार्वेकरांनी उपस्थित केला.

ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या चुकांमुळे त्यांच्यावर पक्ष गमावण्याची वेळ आल्याचा दावाही नार्वेकरांनी केला. या वेळी त्यांनी अर्धवट म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच अर्धवट म्हणजे अर्धवेळ म्हणायचे आहे, असेही त्यांनी खुलासा केला. तर पार्टटाइम वकिल म्हणत अनिल परबांचीही खिल्ली उडवली. तसेच पक्ष चालवताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली.

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, २०१३ मी शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलो तरी त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे अधिकार मला नाही. पक्षसंघटना चालवणे हे जबाबदारीचे काम आहे. पक्षात जे काही बदल होतील ते कपाटात ठेवून जमत नाही. त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे असते. त्याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देणे गरजेचे आहे. मात्र पार्टटाइम अध्यक्ष आणि पार्टटाइम वकील असले तर पक्षाबाबत काय होते हे आता सर्वांनी पाहिले आहे. याची सर्व राजकीय पक्षांनी दखल घेतली पाहिजे. तसेच मी दिलेला निर्णय योग्यच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल परब (Anil Parab) दाखवतात ते पुरावे खोटे असल्याचा दावाही नार्वेकरांनी केला. ते म्हणाले, परबांकडे पक्षात ज्या निवडी झाल्या त्याचीच माहिती आहे. आता ते जे बोलले ते माझ्यासमोर का बोलले नाहीत? २०१८ घटना दुरुस्तीबाबत ते ४ एप्रिल २०१८ चे पत्र दाखवत असतात. ते वाचून दाखवले जात नाही. त्यात संविधानााबाबत एकही उल्लेख केलेला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला माहिती पुरवल्याचे असलेले पुरावे दाखवतात खोटे आहेत. मी दिलेला निर्णय शंभर टक्के खरा आणि न्यायालयाला धरून आहे, असा दावाही नार्वेकरांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT