Sanjay Raut-Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

Wankhede Meet Raut : समीर वानखेडे-संजय राऊतांची भेट विदर्भात शिवसेनेला नवा चेहरा मिळवून देणार...

Vijaykumar Dudhale

Mumbai News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज दिवाळीनिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यावेळी शिवसेनेनेही मलिक यांच्या बाजूने उभे राहत वानखेडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. (Sameer Wankhede meet Shivsena MP Sanjay Raut)

समीर वानखेडे हे गेली काही दिवसांपासून चर्चेत आहेत, ते आपले मूळ गाव असलेले विदर्भातील वाढत्या संपर्कामुळे. विदर्भातील त्यांच्या दौऱ्यांमुळे ते राजकारणात उतरतील, अशी चर्चा राज्यात आहे. मात्र, वानखेडे यांनी याबाबत कुठलेही भाष्य केलेले नाही. मात्र त्यांच्या राजकीय भेटीगाठी मात्र सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी नागपुरात रेशीम बागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समीर वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड गावाचे रहिवासी आहेत. त्या भागातही त्यांचे दौरे वाढले आहेत. या जिल्ह्यातून स्वतः वानखेडे अथवा क्रांती रेडकर यांना निवडणूक तर लढवायची नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः विदर्भात शिवसेनेला प्रसिद्ध चेहऱ्याची असलेली गरज वानखेडे पूर्ण करू शकतात. त्या दृष्टीने शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे का, असाही सवाल उपस्थित होत आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या संजय राऊत आणि समीर वानखेडे यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर याच शिवसेनेने समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. मात्र, आज त्याच वानखेडेंशी खासदार राऊत यांनी चर्चा केल्याने खळबळ उडाली आहे.

वानखेडे-राऊत भेटीवर दरेकरांची कडवट टीका

समीर वानखेडे आणि संजय राऊत यांच्या भेटीवर भाजपचे आमदार दरेकर यांनी मात्र जोरदार टीका केली आहे. संजय राऊत आणि समीर वानखेडे हे दोघेही आरोपी आहेत. गुन्ह्यातून बाहेर कसे सुटावे, यावर कदाचित दोघांमध्ये चर्चा झाली असावी. समीर वानखेडे आणि संजय राऊत हे जर महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ठरवणार असतील तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राच्या राजकारणात असू शकत नाही, असे टोलाही त्यांनी या दोघांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT