Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचे मोठे विधान; ‘जनतेला अन्‌ कायद्याला अपेक्षित निर्णय देणार’

Rahul Narwekar Statement : जनतेला न्याय मिळेल, असा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल.
Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification CaseSarkarnama

Maharashtra Political News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय येत्या ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे एक मोठे विधान पुढे आले आहे. जनता आणि कायद्याला अपेक्षित असणारा निर्णय आपण देऊ, असे सूचक वक्तव्य नार्वेकर यांनी केले आहे. (Shiv Sena MLA disqualification case : Rahul Narwekar's big statement in Shiv Sena MLA disqualification case)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रेतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने सरन्यायाधीशांनी कडक शब्दांत विधानसभा अध्यक्षांनी कानउघडणी केली होती. तसेच, नार्वेकरांचे वकिल देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करून वेळापत्रक ठरविण्याची सूचना केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sena MLA Disqualification Case
One Crore Bribery Case : एक कोटी लाच प्रकरण; ‘वाघ’च्या शोधासाठी ‘लाचलुचपत’चे पथक ऐन दिवाळीत ‘ऑन ड्यूटी’

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कानपिचक्यानंतर ॲड नार्वेकर यांनी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायायाने विधानसभा अध्यक्षांची विनंती धुडकावून लावत शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेण्यात यावा, असा आदेश दिला होता. त्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग आला आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (ता. १२ नोव्हेंबर) मुंबईत बोलताना आमदार अपात्रता प्रकरणावर मोठे भाष्य केले आहे. जनतेला न्याय मिळेल, असा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल. लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा निर्णय हा मॅजोरिटी मॅटर असतो. त्यामुळे जो कायद्यात आणि संविधानात तरतुदी असतील त्या सर्वांचे पालन करून जननेतला अपेक्षित असणार आणि कायद्यानुसार आपण निर्णय देऊ, असे नार्वेकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

Shiv Sena MLA Disqualification Case
Amit Thackeray Adopted village : अमित ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत घेतली विकासासाठी दत्तक

फटाके फुटायला अजून वेळ आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असेही त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासंदर्भात बोलताना ॲड राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Shiv Sena MLA Disqualification Case
Jalgaon Politics : माजी खासदार ए. टी. पाटलांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; पाच वर्षांनंतर सक्रीय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com