Vinod Tawde-Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Tawde Meet Raj Thackeray : मुंबईत मतदानाला अवघे काही तास उरले असताना तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभा मतदानाला अवघे काही तास उरले असताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. ही भेट सदिच्छा भेट होती, असे भाजपचे विनोद तावडे यांनी सांगितले असले तरी या भेटीला उद्या मुंबईत होणाऱ्या मतदानाचा पदर आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 19 May : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या (ता. 20 मे) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली, त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी ठाकरे-तावडे यांच्यात काय स्ट्रॅटेजी झाली, याची उत्सुकता मुंबईकरांना आहे.

महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यात 13 जागांसाठी उद्या सोमवारी (ता. 20 मे) मतदान होणार आहे. त्यात मुंबई आणि परिसरातील दहा जागांचा समावेश आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मुंबई या मुंबईतील सहा मतदारसंघाबरेाबरच शेजारच्या ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मोठी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (Congress) युतीने सत्ताधारी महायुतीपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात शिवसेनेची ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी महायुतीने मनसे प्रमुख राज ठाकरेंची मदत घेतली आहे. राज यांनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी काही शहरांत सभाही घेतल्या आहेत, त्यामुळे या शेवटच्या टप्प्यात महायुतीला राज ठाकरेंची (Raj Thackeray) मुंबई आणि उपनगरांमधील ताकद कामी येणार आहे.

लोकसभा मतदानाला अवघे काही तास उरले असताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. ही भेट सदिच्छा भेट होती, असे भाजपचे विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सांगितले असले तरी या भेटीला उद्या मुंबईत होणाऱ्या मतदानाचा पदर आहे. त्या अनुंषगाने या दोन नेत्यांमध्ये नक्कीच चर्चा झाली असणार आहे.

मुंबईतील सहा जागांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाबाबत या दोन नेत्यांमध्ये रणनीती ठरली असण्याची शक्यता आहे. मनसे ही मुंबईत केडर बेस पार्टी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत दोन हात करण्यची ताकद मनसे सैनिकांमध्ये आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान महायुतीच्या बाजूने घडवून आणण्यासाठी मतदारांना बूथपर्यंत न्यावे लागणार आहे, त्यासाठीच मनसे कार्यकर्त्यांची मदत भाजपला मिळू शकते. त्यामुळे ठाकरे-तावडे यांच्या भेटीत नक्की कोणती रणनीती आखली गेली आहे, याचा उलगडा उद्या होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT