Sushama Andhare On Devendra Fadnavis : 'फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलंय..!' सुषमा अंधारेंचा टोला

Vinod Tawde : फडणवीस यांच्या पुन्हा येईना वक्तव्याची देखील आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये 'आता कधीच येणार नाही' असा हॅशटॅग वापरून सुषमा अंधारेंनी खिल्ली उडवली आहे.
Vinod Tawde  Devendra Fadnavis Sushma Andhare On Devendra
Vinod Tawde Devendra Fadnavis Sushama Andhare On Devendra sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : विनोद तावडे हे कधीकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मात करत मुख्यमंत्री पद पटकावले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट देखील नाकारण्यात आले होते. तेच तावडे आता नरेंद्र मोदी, अमित शहा, यांच्या नंतरचे मोठे नेते मानले जात आहेत. महाराष्ट्रात एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत, हाच धागा पकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत विनोद तावडेंचे नाव घेत देवेंद्र फडणवीसांना डिवचले आहे.

Vinod Tawde  Devendra Fadnavis Sushma Andhare On Devendra
Eknath Khadse News : स्वगृही परतण्यासाठी नाथाभाऊंना भाजपने घातल्या अटी; आमदारकी अन्...

'पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..फडणवीसांना विनोद तावडे (Vinod Tawde ) यांनी चिटपट केलंय..!' अशी पोस्ट ट्विटवर सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता कधीच येणार नाही...

विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली होती. त्यानंतर नुकतेच फडणवीस यांनी मी पुन्हा दोन पक्ष फोडून आलो, असे देखील म्हटले होते. फडणवीस यांच्या पुन्हा येईना वक्तव्याची देखील आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये 'आता कधीच येणार नाही' असा हॅशटॅग वापरून सुषमा अंधारेंनी खिल्ली उडवली आहे.

खडसेंचा पक्ष प्रवेश दिल्लीत

महाराष्ट्रातील इतर नेत्यांनी जेव्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांचा पक्षप्रवेश भाजपच्या मुंबईच्या कार्यालयात झाला. मात्र, एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश हा दिल्लीत होणार आहे. त्यामुळे खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी दिल्लीतूनच प्रयत्न झाल्याचे स्पष्ट आहे.

Vinod Tawde  Devendra Fadnavis Sushma Andhare On Devendra
PM Modi : संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी, नंतर मोदी !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com