Nashik NCP Ajit Pawar sarkarnama
नाशिक

Nashik Constituency 2024 : महायुतीची डोकेदुखी; अजित पवार गटाचे निवृत्ती अरींगळे बंडाच्या तयारीत

Hemant Godse खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करूनही महायुतीत खदखद कायम

Sampat Devgire

Nivrutti Araingale news : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे . ही उमेदवारी जाहीर करताना सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा करण्यात आली. त्यानंतरही इच्छुकांमधील असंतोष कमी होण्याची चिन्हे नाहीत.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निवृत्ती अरिंगळे यांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाला सोडण्यात आला. त्यानंतर येथून खासदार गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सध्या खासदार गोडसे प्रचारात व्यस्त आहेत.

मात्र, महायुतीतील सहकारी पक्ष अद्यापही जागावाटपाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले दिसत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाच्या प्रचारातही अडथळे येऊ लागले आहेत. या संदर्भात आज श्री. अरींगळे यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. नाशिक रोड येथे झालेल्या या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिक मतदारसंघात यंदा मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

येथे दोन दिवसात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहोत. अपक्ष उमेदवारी करण्याचा देखील आपल्या मनोदय आहे, असे अरींगळे यांनी सांगितले. यावेळी भगुरचे माजी नगराध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, अजित पवार गटाचे विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, अनिल चौगुले, गणेश खर्जुल, वसंत आरिंगळे, सुनील महाले, रमेश ताजनपुरे, संजय गाडेकर, रितेश केदारे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातील काही पदाधिकाऱ्यांनी श्री. अरींगळे यांना निवडणुकीसाठी निधीदेखील जाहीर केला. यामध्ये श्री. चौगुले आणि श्री खर्जुल यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने आज घेतलेली भूमिका ही अप्रत्यक्षपणे बंडखोरीचा इशारा आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आणि विशेषतः पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यांनी घडविलेला समेट अल्पकालीन ठरला आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना या नाराज इच्छुकांची समजूत काढावी लागणार आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT