Baramati News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात दररोज नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवर यांची गोविंद बागेत भेट घेतली. त्याला काही दिवस होत नाहीत, तोच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जाचक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे एका एका मताची जुळवणी सध्या बारामतीत सुरू असल्याचे दिसून येते. (Loksabha Election 2024)
राज्यात सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. संभाव्य नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. बारामतीची राजकीय हवाही चांगलीच तापलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दररोज गाठीभेटी होताना दिसत आहेत. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. (NCP News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. या भेटीवेळी जाचक कुटुंबीय आणि नटराजचे अध्यक्ष किरण गुजर उपस्थित होते. ही सदिच्छा भेट होती, असे सांगितले जात असले तरी लोकसभा निवडणुकीतील काँटे की टक्कर पाहता एका एका मतासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. (Marathi Political News)
सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांची राहू येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली हेाती. त्या भेटीवेळीही कुल यांचे कुटुंबीय हाेते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे नेते असेलल्या पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठीतून बेरजेचे राजकारण होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या मुलाने गोविंद बागेत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर जाचक यांची सुनेत्रा पवार यांनीही भेट घेतल्याने जाचक हे प्रकाशझोतात आले आहेत. जाचक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. साखर क्षेत्रातील जाणकार म्हणून पृथ्वीराज जाचक यांना ओळखले जाते.
दरम्यान, शरद पवार यांच्यापाठोपाठ आता अजितदादा गटानेही साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली आहे. पण, जाचक यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे जाचक आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकणार, याकडे इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.