Radhakrishna Vikhe - Patil, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Pune Political News : 'मी विखेंचा फॉर्म्युला वापरतोय', अजित पवार असं का म्हणाले?

Sudesh Mitkar

Pune Political News : पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेत विकासकामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे-फडणवीस गटाच्या सदस्यांनी निधीच्या असमान वाटपावरून पवार यांच्याविरोधात दंड थोपटून कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. यावर आता पवारांनी भाष्य केले आहे. त्यामुळे पुढील काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे (Pune) जिल्हा नियोजन समितीमध्ये आता नव्या वादाचे फटाके फुटत आहेत. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप-शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट एकत्रित आहेत. मात्र नियोजन समितीत निधीवाटपावरून हे सगळे एकमेकांसमोर येऊन ठाकले आहेत. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामे मंजूर झाली आहेत.

ही कामे रद्द करा; अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा भाजप (BJP) आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांना दिला आहे. तसेच सदस्यांकडून एक निवदेन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं आहे. या तीन पक्षांतील नेत्यांनी विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद वाटून घेतले आहे.

यावेळी निधीवाटपाबाबत काही सूत्रे ठरली आहेत. सोलापूरचे पालकमंत्री असताना राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe - Patil) यांनी जे सूत्र ठरवलं आहे. ते सूत्र पुण्यामध्ये ठरवण्यात आले आहे. काही समज-गैरसमज झाले असतील तर मला नाही माहीत, असं म्हणत अजित पवार यांनी निधीवाटपाचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात ढकलला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार म्हणाले, मी आज पुण्याचा पालकमंत्री झालो नाही, गेले अनेक वर्षे मी पुण्याचा पालकमंत्री आहे. जनतेने, माझ्या पक्षाने आणि माझ्या सहकाऱ्यांनी मला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्वसामान्यांना आणि सर्व पक्षातील नेत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT