Ravindra Dhangekar-Hasan Mushrif-Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Lalit Patil Drugs Case : आमदार धंगेकरांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Chaitanya Machale

Pune News : ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणातील मुख्य दोषी असलेले ससून हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये डॉ. ठाकूर दोषी असतानाही अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील काही मंत्री त्यांना वाचवित असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. (MLA Ravindra Dhangekar made serious allegations against Hasan Mushrif)

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे डॉ. ठाकूर यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी परवानगी मागितली आहे. मात्र 25 दिवस उलटून गेल्यानंतरही यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ते ड्रग तस्कर पाटील याला पाठीशी घालत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलत त्यांना अटक करावी, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

डॉ. ठाकूर यांनी ललित पाटील याच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली ससून रुग्णालयातील त्याचा मुक्काम अधिक कसा वाढेल, यासाठी मदत केली. ही सर्व माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पाटील याला ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच्या पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉ. ठाकूर यांनीच घेतल्याचे निष्पन्न झाले होते, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले

दरम्यान, डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून अटक करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले आहे. मात्र, ड्रग माफिया पाटील याच्यावर कारवाई करण्यास परवानगी देऊ नये, अशी शिफारस मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यामध्ये स्वतः लक्ष घालून डॉ. ठाकूर यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT