Indapur Politics : जानकरांच्या गळाला कोण लागणार?; प्रवीण मानेंपाठोपाठ आप्पासाहेब जगदाळेंनाही ऑफर!

Jankar Offer To Jagdale : जगदाळे यांनी आगामी काळात आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून इंदापूर तालुक्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे.
Mahadev Jankar- Appasaheb Jagdale
Mahadev Jankar- Appasaheb JagdaleSarkarnama

Indapur News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांची नजर आता इंदापूर विधानसभा मतदारसंघावर असल्याचे दिसते. कारण, त्यांनी गेल्या तीन महिन्यांत इंदापुरातील दोन बड्या नेत्यांना रासप प्रवेशाची ऑफर दिली आहे. आता या दोन नेत्यांपैकी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जानकर यांच्या गळाला कोण लागतं, याची उत्सुकता इंदापूकरांना असणार आहे. (Mahadev Jankar offers Appasaheb Jagdale to join Rashtriya Samaj Party)

इंदापूर बाजार समितीच्या वतीने कृषी महोत्सव-2024 चे आयोजन केले होते. त्याचा समारोपास आमदार महादेव जानकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी बाजार समितीचे माजी सभापती तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेशाची ऑफर दिली आहे. (Indapur Politics)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar- Appasaheb Jagdale
NCP MLA Disqualification Hearing : अजितदादा गटाची शरद पवारांना शह देण्याची खेळी; सुनावणीवेळी काय घडलं पाहा...

जानकर म्हणाले, आप्पासाहेब जगदाळे यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, हे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. जगदाळे यांनी आगामी काळात आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून इंदापूर तालुक्याचे नेतृत्व करावे. जानकर यांनी एक प्रकारे आप्पासाहेब जगदाळे यांना रासप प्रवेशाची ऑफर देऊन टाकली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मी आप्पासाहेब जगदाळे यांचे नेतृत्व पाहत आहे. माझा आणि त्यांचा गेली २० वर्षांपासून परिचय आहे. त्यांच्याशी आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांच्यामध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुण आहेत, त्यामुळे त्यांनी आता आमदार, खासदार आणि मंत्री व्हावे, अशी अपेक्षाही जानकर यांनी व्यक्त केली.

Mahadev Jankar- Appasaheb Jagdale
Ajit Pawar Kolhapur Tour : ‘मी, मुख्यमंत्री अन्‌ फडणवीस एकत्र बसून भुजबळांशी बोलणार’; भुजबळ तिघांचा सल्ला ऐकणार का?

दरम्यान, जानकर यांनी गेल्या आक्टोबर-२०२२ मध्ये प्रवीण माने यांच्यासंदर्भात भाकित केले होते. आमदार दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वादात प्रवीण माने हे आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूरचे आमदार होऊ शकतात, असे विधान त्यांनी रुई येथील कार्यक्रमात बोलताना केले होते.

प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असून सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहेत. ते सध्या शरद पवार गटात आहेत. तर दत्तात्रेय भरणे हे अजित पवार गटात आहेत. महायुतीमध्ये ही जागा विद्यमान आमदार असल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार हेही महत्वाचे आहे.

Mahadev Jankar- Appasaheb Jagdale
Solapur NCP : वडील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष; तर मुलगा अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष!

दुसरीकडे, हर्षवर्धन पाटील यांची भूमिकाही महत्वाची राहणार आहे. त्यातच जानकर यांनी दोन महत्वाच्या आणि बड्या नेत्यांना रासप प्रवेशाची ऑफर दिली आहे. आता त्यांची ऑफर कोण स्वीकारणार आणि निवडणुकीत कोण गळाला लागणार, याची उत्सुकता इंदापुरात असणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Mahadev Jankar- Appasaheb Jagdale
OBC Melava : सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर आक्रमक भुजबळ नगरमधून फुंकणार संघर्षाचे रणशिंग!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com