Ajit Pawar-Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe Vs Ajit Pawar : पलटीसम्राट अन्‌ खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगला; कोल्हेंचा अजितदादांवर प्रतिहल्ला

Shirur Loksabha election 2024 : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहिलो. भूमिका कोणी बदलली, हे सर्वांनाच माहीत आहे. नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेलं चांगलं. पण, पलटीसम्राट आणि खोकेसम्राट यापेक्षा नटसम्राट असणं कधीही चांगलं.

Sudesh Mitkar

Pune, 15 April : नटसम्राट म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगलेच भडकले. त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत पलटीसम्राट आणि खोकेसम्राट असा उल्लेख केला. पलटीसम्राट आणि खोकेसम्राट यांच्यापेक्षा नटसम्राट असणं कधीही चांगलं, असं म्हणत अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिहल्ला चढवला.

खेड तालुक्यातील सांडभोरवाडी-काळूस जिल्हा परिषद गटात खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा गावभेट दौरा होता. काळूस गावात बोलताना खासदार कोल्हे यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील समाधीबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना घेरलं. ते म्हणाले की, एवढी वर्षे समाधी वढू बुद्रुक-तुळापूरला असताना काहीजण अनेक वर्षे खासदार होते. तुम्ही एवढी वर्षे पालकमंत्री होतात. मग मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो की, तुम्ही आजपर्यंत या समधीस्थळाला एकही रुपया का दिला नाही?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे म्हणाले, कलाकार म्हणून जी कला सादर केली, त्या माध्यमातून माझ्या राजाचा इतिहास १५७ देशांमध्ये पोहाेचवला. ज्याला तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवता ना, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. सगळी प्रलोभने असताना दहा-दहा वेळा इकडे ये, असे फोन असताना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहिलो. भूमिका कोणी बदलली, हे सर्वांनाच माहीत आहे.

नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेलं चांगलं. पण, पलटीसम्राट आणि खोकेसम्राट यापेक्षा नटसम्राट असणं कधीही चांगलं, असं जाहीरपणे सांगत अजित पवार यांच्यावर खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रतिहल्ला चढवला.

‘मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागायला येणाऱ्यांना आता प्रश्न विचारला पाहिजे, की दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला कसं पंतप्रधान करायचं? शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार घरी बसवण्याची हीच ती वेळ आहे. दहा वर्षे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली, अजून माती कालवायची नाही; म्हणून आता हे सरकार उलथून टाकण्याचीही वेळ आली आहे, असे म्हणत भाजपच्या केंद्रातील सरकारवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT